Narendra Modi News : '2024'च्या निवडणुकीत होईल भाजपच्या ऐतिहासिक विजयाची नोंद..!

PM Narendra Modi Inauguration of Surat Airport and Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी ; सूरतमधील विमानतळ आणि सूरत डायमंड बोर्सच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन..
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : भाजपने देशातील तीन राज्यात आपले सरकार स्थापन केले आहे. तेलंगणातही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या ऐतिहासिक विजयाची नोंद होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये व्यक्त केला. तर सामान्य नागरिकाच्या मनात धोरण, हेतू, नेतृत्व आणि कामाचा ट्रॅक या चार प्रमुख निकषांवरुनच भाजप (BJP) वर विश्वास असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सूरत (Surat) डायमंड एक्सचेंजचे म्हणजेच 'सूरत डायमंड बोर्स'चे उद्घाटन केले. ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे. यापूर्वी हे यश पेंटागॉनच्या नावावर होते. आज सूरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिरा छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

PM Narendra Modi
BJP Politics : संतापलेल्या शेतकऱ्यांनी ‘विकसित भारत' रथ गावातून हाकलला!

सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे, जे जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स असून हे सूरत शहराजवळील खजोद गावात आहे. सूरत हे हिरे उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, सूरत विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन मोदींनी केले.

टर्मिनल इमारत सर्वात व्यस्त असतानाही 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाताळण्यास सक्षम आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल आल्यानंतर मोदींच्या हमीभावाची अधिक चर्चा होत आहे. येथील कष्टकरी जनतेने 'मोदींच्या हमी'चे वास्तवात रूपांतर करताना पाहिले असून 'सूरत डायमंड बर्से' हेही या हमीभावाचे उदाहरण आहे.

सूरतच्या हिऱ्याला वेगळीच चमक असून ती जगभर ओळखली जाते. सूरत विमानतळ आता आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे.

सुरत आयटी क्षेत्रातही प्रगतीपथावर..

'सूरत डायमंड बोर्स' इमारत भारतीय डिझायनर, साहित्य आणि संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करते. ही इमारत नव्या भारताच्या नव्या ताकदीचे आणि नव्या संकल्पाचे प्रतीक आहे.

PM Narendra Modi
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक...

सुरत एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होते. इथल्या लोकांनी आपल्या मेहनतीने डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवली आहे. आज सूरत हे लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे. आता सूरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत असल्याचे मोदींनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारत तिसऱ्या टप्प्यात 'टॉप-3' अर्थव्यवस्था

गेल्या 10 वर्षांत भारत अर्थव्यवस्थांमध्ये 10 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. तिसऱ्या टप्प्यात भारतचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल. जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. 'मेड इन इंडिया' आता एक मजबूत 'ब्रँड' बनला आहे.

(Edited by Amol Sutar)

PM Narendra Modi
Pune Crime : पाय धुतलेले पाणी प्या,स्पर्धा परीक्षेत यश मिळवा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com