Yavatmal Shasan Aplya Dari : पोलिसाचं टेन्शन वाढलं! मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा...

Maratha Reservation: कितीही पोलिस बंदोबस्त लावला, तरी आम्ही कार्यक्रम उधळून लावू...
Yavatmal Shasan Aplya Dari
Yavatmal Shasan Aplya Dari Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal : यवतमाळमध्ये आज (सोमवारी) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम असून, हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. प्रशासनाने कितीही पोलिस बंदोबस्त लावला तरी आम्ही कार्यक्रम उधळून लावू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने पोलिसाचं टेन्शन वाढलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणावर वातावरण तापलेलं असताना हा कार्यक्रम होत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे, तर देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगड दौऱ्याला गेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमास दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yavatmal Shasan Aplya Dari
Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मराठा आंदोलकांच्या धास्तीने एसटी बसला पोलिसांचे कवच; बससेवा दुसऱ्या दिवशीही बंद

कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री येत आहेत, तर दुसरीकडे यवतमाळमधील मराठा समाज आक्रमक झाला आहे. नेत्यांच्या फलकाला काळे फासल्यानंतर बॅनर फाडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू ,अशा इशारा मराठा समाजाने दिल्यानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध दाखले वितरीत करण्यात येणार आहेत. जवळपास पाच ते सहा एकरमध्ये सभामंडप उभारण्यात आला आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने विदर्भातील पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. जागोजागी पोलिसांकडून तपासणी केली. मगच कार्यक्रमासाठी आत सोडलं जाणार आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

Yavatmal Shasan Aplya Dari
Beed Latest News : बीडमध्ये मध्यरात्री तहसीलदारांची गाडी पेटविली !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com