Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षणाच्या बैठकीला काँग्रेस, ठाकरे गटाच्या खासदारांची दांडी

Maharashtra Politics : बैठकीत आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार होती.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील खासदारांची बैठक बोलवली होती. बैठकीला ठाकरे गटाच्या खासदांरासह काँग्रेस खासदारांनीही दांडी मारली.

हेमंत पाटील यांनी राज्यातील (लोकसभा ४६ खासदार आणि राज्यसभा १९ खासदारांना) खासदारांना फोन करून आणि पत्र पाठवून बैठकीचे निमंत्रण दिले होते.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

बैठकीला फक्त २१ खासदारच उपस्थित होते. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार होती. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

संसदेच्या विशेष अधिवेशनात काल महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाल्यानंतर सायंकाळी या विधेयकावर मतदान घेण्यात आले. या वेळी या विधेयकाच्या समर्थनार्थ 454 जणांनी मतदान केले असून, दोन जणांनी विरोध केला आहे. लोकसभेत संमत झालेले हे विधेयक समंतीसाठी राज्यसभेत जाणार आहे.

Maratha Reservation
Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला ; बीड जिल्ह्यातल्या सरपंचाने चौंडीत येऊन केले मुंडन !

वडेट्टीवार म्हणाले, "महिला आरक्षणावर काँग्रेसने टीका केली आहे. मोदी सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली जनतेला आणखी एक चॉकलेट दिल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली. केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली जनतेला आणखी एक चॉकलेट दिले आहे. आरक्षण केव्हा लागू होईल, होईल की नाही होणार, याबद्दल अनिश्चितता आहे. देशभरातील मोदीभक्त मात्र या विधेयकाचे स्वागत करण्यात गुंग आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष कसे भरकटवायचे, हे भाजपकडून शिकायला पाहिजे,"

Maratha Reservation
Mangalvedha News : बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये ; 'स्वाभिमानी' संतापली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com