Maratha Reservation: संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा; शिवसेनेच्या दोन खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

Om Birla and Hemant Patil: लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
Maratha Reservation and Shivsena
Maratha Reservation and Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला असून, राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत असून, काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. यानंतर राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिलेले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यावर काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation and Shivsena
Hemant Patil Resign: हेमंत पाटलांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने स्वीकारला; पण ओम बिर्लांच्या भूमिकेकडे लक्ष

लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे सुपूर्त केला. मात्र, ज्यावेळी राजीनामा सुपूर्त केला, त्यावेळी लोकसभा अध्यक्ष उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ओम बिर्ला हे हेमंत पाटील यांचा राजीनामा स्वीकारणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत, तर ज्याचे निजामकालीन पुरावे सापडले आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंबंधीचा आदेश सरकारने जारी केला आहे.

त्यानुसार आता कुणबी जात प्रमाणपत्रं वाटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका स्पष्ट करतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Maratha Reservation and Shivsena
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगर परिषद पेटवली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com