Haryana Election: मोठी बातमी! भाजपची काँग्रेस - 'आप'वर कुरघोडी; 'एवढ्या' उमेदवारांची पहिली यादी जाहीर

BJP Candidates First List Haryana Assembly Election 2024: हरयाणामधील 90 जागांसाठी आता 5 ऑक्टोबरला निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे. त्यातच आता भाजपने या उमेदवारांची यादी जाहीर घेत आघाडी घेतली आहे.
Haryana Assembly Election
Haryana Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Vidhansabha 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केसा आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी येथे मतदान पार पडणार आहे.पण निवडणूक आयोगाने हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे.

हरयाणामधील (Haryana) 90 जागांसाठी आता 5 ऑक्टोबरला निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे. त्यातच आता भाजपने या उमेदवारांची यादी जाहीर घेत आघाडी घेतली आहे. जम्मू-काश्मीरसह हरयाणा निवडणुकीचा निकालही आता 8 ऑक्टोबरला लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहे.

भाजपकडून (BJP) हरयाणा विधानसभेच्या 90 जागांपैकी तब्बल 67 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्याच यादीत भाजपने तब्बल 67 उमेदवारांची घोषणा केल्यामुळे विरोधी पक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळेस काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडीसाठी घडामोडींना वेग आला आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना पुन्हा एकदा भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून धक्कातंत्र वापरण्यात आले आहे. मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या मतदारसंघ भाजपने बदलला आहे. त्यांना करनालऐवजी लाडवा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.कैथलमधून लीला राम गुर्जर,पंचकूलातून ज्ञान चंद गुप्ता,यमुनानगरमधून यंदा धनश्याम दास अरोड़ा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

Haryana Assembly Election
Bajirao Khade On Congress: शरद पवार गटात पाऊल ठेवताच बाजीराव खाडेंनी काँग्रेसवर तोफ डागली

भाजपने निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. हरयाणा भाजपने (BJP) या संदर्भात भाजपने आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये 1 ऑक्टोबरला होणारं मतदान पुढे ढकलावं अशी विनंती केली आहे.

हरयाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान म्हणाले होते की, भाजपला पराभव समोर दिसत आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे निमित्त वापरून त्यांना निवडणूक पुढे ढकलायची आहे. मात्र, जनतेने भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com