Manipur Violence News : मुख्यमंत्री बीरेन सिंह अन् गृहमंत्री अमित शाह यांची भेट; मणिपूरची स्थिती काय?

Manipur CM N. Biren Singh Meet Amit Shah : मणिपूरच्या काही आमदारांनी अधिवेशनात येण्यास असमर्थता दर्शवली!
Manipur Violence News :
Manipur Violence News : Sarkarnama

Delhi News : मागील अनेक दिवस हिंसाचाराने मणिपूर धुमसत आहे. तेथील परिस्थिती सामान्य राखण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग (N. Biren Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. यासोबतच त्यांनी ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती सामान्य राखण्यासाठी सरकारकडून घतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. (Latest Marathi News)

Manipur Violence News :
Congress Vs BJP : नेहरू की मोदी ? चांद्रयानातील 'इस्रो'च्या यशातील श्रेयासाठी नेत्यांची उड्डाणे !

या बैठकीत मणिपूरमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह मणिपूरमधील (Manipur) काही मंत्रीही उपस्थित होते. शाह यांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले होते, "आम्ही गृहमंत्र्यांशी मणिपूरबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहोत. आता मणिपूरमधील हिंसाचार आटोक्यात आली, परिस्थितीत सुधारणा होत आहे."

मणिपूरमध्ये कुकी-मेतेई समाजात हिंसाचार सुरू असताना, सत्ताधारी भाजपसह 10 कुकी समाजाच्या आमदारांनी मणिपूर विधानसभा अधिवेशनात उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. राज्य सरकार शांतता चर्चेत अडथळा आणत आहे, असे वाटल्याने नागा आमदारांनीही अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याचेही सांगितले होते.

काय म्हणाले बिरेन सिंह?

मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, "मणिपूरमधील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. डोंगर आणि खोरे भागातील हिंसाचारग्रस्त लोकांचे पुनर्वसन करणे ही आमची प्राथमिकता आहे. आठ ठिकाणी शिबिर निवारे बांधली जात आहेत. बंदूकी हल्ले होऊ शकतात ही भीती आता संपली आहे. आमचा विश्वास आहे की परिस्थिती पूर्ववत होईल. सामूहीक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

Manipur Violence News :
Threat To MLA Prasad Lad : गृहमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार लाड यांच्या जीवाला धोका? मुख्यमंत्र्यांना पत्र..

मणिपूरमध्ये हिंसाचार कधीपासून सुरू ?

मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय हिंसाचाराला सुरुवात झाली. मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी डोंगरी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला. त्यानंतर मणिपूरमध्ये पहिल्यांदाच जातीय संघर्ष झाला.

या हिंसाचारात आतापर्यंत 150 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून. शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येच्या 53 टक्के लोकसंख्या मैतेई आहे आणि ते बहुतेक इम्फाळच्या खोऱ्यात राहतात. कुकी आणि नागा समाजाची लोकसंख्या 40 टक्क्यांहून अधिक आहे. हे लोक डोंगराळ भागात राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com