Threat To MLA Prasad Lad : गृहमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार लाड यांच्या जीवाला धोका? मुख्यमंत्र्यांना पत्र..

Prasad Lad Letter to CM : फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याला जीवाची भीती वाटणे म्हणजे..
Threat To MLA Prasad Lad
Threat To MLA Prasad Lad Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेवरील आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लाड यांनी एक पत्र पाठवत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांनी अशाच आशयाचं पत्र मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) यांनाही पाठवून, आपल्याला कोणीतरी जीवे मारण्याची प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

Threat To MLA Prasad Lad
BJP Prasad Lad News: फडणवीसांच्या लाडक्या लाड यांनी गृहखात्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडलं!

मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका आहे म्हणतानाच, एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशयही त्यांनी बोलून दाखवला आहे. लाड यांनी एका गायकवाड नावाच्या व्यक्तिकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचेही संबंधित पत्रात सांगितले आहे.

Threat To MLA Prasad Lad
Akola Political News: प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'ची मोर्चेबांधणी !

प्रसाद लाड हे भाजपचे आमदार असण्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि निकटवर्तीय नेते मानले जातात. फडणवीस यांच्यामुळेच त्यांना भाजपची विधानपरिषेदेची उमेदवारी मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याला जीवाची भीती वाटणे, त्यांच्या पाळत ठेवण्याचा प्रयत्न करणे, त्याबाबत त्यांनी जाहीर तक्रार करणे यामुळे याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com