Mehul Choksi Arrest : मोठी बातमी! पीएनबी घोटाळ्यातील फरार व्यापारी मेहुल चोक्सीला अटक

Mehul Choksi Arrested In Belgium : 13 हजार 500 कोटींचा घोटाळा केल्यानंतर मेहुल चोक्सी परदेशात पळून गेला होता. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे.
Mehul Choksi Arrested
Mehul Choksi Arrestedsarkarnama
Published on
Updated on

Mehul Choksi Arrested : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. 13 हजार 500 कोटींचा घोटाळा केल्यानंतर मेहुल चोक्सी परदेशात पळून गेला होता. भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरून त्याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.

मेहुल चोक्सी हा गुजरातीमधील हिरे आणि ज्वेलर्स क्षेत्रातील व्यापारी होता. गितांजली ग्रुपचा तो माजी संचालक आहे. त्याने आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेकडून 13 हजार 500 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्जाची परत फेड केली नव्हती. त्याने परदेशी बँकांकडून देखील कर्ज घेतल्याचे समोर आले होते. हा घोटाळा 2018 मध्ये उघड झाला.

Mehul Choksi Arrested
Aaditya Thackeray : उत्तर भारतीयांसमोर बोलतानाच आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, "भाजप-मनसेची सेटिंग..."

घोटाळा उघडकीस आल्यानंतर तो भारताबाहेर पळून गेला. त्याने कॅरेबियन बेटावरील एंटीगुआ या देशात जाऊन तेथील नागरिकत्व घेतले. भारतीय सुरक्षा एजन्सी त्याच्या मागावर होत्या मात्र तो सहा वर्षांपासून गुंगारा देत होता. त्याच्या विरोधात इंटरपोलची नोटीस देखील जारी करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार बेल्जियमध्ये मोहूल चोक्सीला 11 एप्रिलला अटक करण्यात आली. भारतीय सुरक्षा एजन्सीकडून त्याचे भारतात प्रत्यर्पण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोहूल हा आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. भारतीय एजन्सीच्या विनंतीवरून त्याला तेथे अटक करण्यात आली.

Mehul Choksi Arrested
Raju Khare : राजू खरेंची निष्ठा नेमकी कोणावर?; शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमदाराची राष्ट्रवादीच्या मेळाव्याला दांडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com