Jharkhand Politics : पक्षांतर करणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व झाले रद्द ; झारखंडमध्ये सभापतींनी जाहीर केला निर्णय!

Jharkhand MLA Membership Termination News हा निर्णय 26 जुलैपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे हे आमदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित होते.
Jharkhand
Jharkhand Sarkarnama
Published on
Updated on

Jharkhand News : पक्षांतर प्रकरणी झारखंडचे दोन आमदार जयप्रकाश भाई पटेल आणि लोबिन हेंब्रम यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केलं आहे. संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत या दोघांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेतल्यानंतर सभापती रवींद्रनाथ महतो यांच्या न्यायाधिकरणाने गुरुवारी हा निकाल दिला. हा निर्णय 26 जुलैपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित होते.

मांडू विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय जनता पार्टीचे जयप्रकाश भाई पटेल लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते आणि काँग्रेसच्या(Congress) तिकीटावर हजारीबाग मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. याचप्रकारे झारखंड मुक्ती मोर्चाचे बोरिया मतदारसंघाचे आमदार लोबिन हेंब्रम राजमहल लोकसभा मतदारसंघात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात मैदानात उतरले होते. या दोन्ही आमदारांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

Jharkhand
Lok Sabha Session : केंद्रीय मंत्री थेट काँग्रेस खासदाराच्या अंगावर धावून गेले; संसदेत नको ते घडलं...

जयप्रकाश भाई पटले यांच्या विरोधात भाजप आणि लोबिन हेंब्रम यांच्या विरोधात झामुमोने पक्षांतराची तक्रार दाखल केली होती. ज्यावर सलग दोन दिवस सुनावणीनंतर बुधवारी न्यायाधिकरणाने 25 जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.

भाजपने काय म्हटलं? -

जयप्रकाश भाई पटेल यांच्याविरोधात तक्रारीवर सुनावणी दरम्यान भाजपकडून(BJP) अधिवक्ता विनोदकुमार साहू यांनी म्हटले होते की, ज्याप्रकारे काँग्रेसमध्ये सहभागी होऊन हजारीबाग मतदारसंघातून जेपी पटेल यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. हे सार्वजिनक आहे आणि निवडणूक आय़ोगाच्या रेकॉर्डवर आहे. अशावेळी साक्ष मागणे आणि त्यानंतर जवाब नोंदवण्यासाठी वेळ मागणे न्यायाधिकरणाचा वेळ जाणूनबुजून वाया घालवण्यासारखे आहे. हे प्रकरण पूर्णपणे विधानसभेच्या दहाव्या अनुसूची नुसार पक्षांतराच्या अंतर्गत येते.

Jharkhand
Rajya Sabha Session : कुलकर्णींचं भाषण, प्रियांका चतुर्वेदींचं स्मितहास्य अन् पटेलांचा संताप; राज्यसभेत महाराष्ट्र गाजला...

जेएमएम ने काय म्हटलं?

अशाप्रकारे लोबिन हेंब्रम यांच्या प्रकरणात अधिवक्ता अनुज कुमार यांनी बाजू मांडत म्हटले की, हा पक्षांतराचा नाही तर पक्षांतर्गत मुद्दा आहे. जेएमएमकडून बाजू मांडताना अधिवक्ता अंकितेश कुमार झा यांनी म्हटले की लोबिन हेंब्रमने पक्षाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवली होती. अशावेळी त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले पाहीजे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com