Lok Sabha Session : केंद्रीय मंत्री थेट काँग्रेस खासदाराच्या अंगावर धावून गेले; संसदेत नको ते घडलं...

Charanjit Singh Channi Ranveet Singh Bittu : चरणजीत सिंह चन्नी आणि रवनीत सिंग बिट्टू यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली.
Ranveet Singh Bittu, Charanjit Singh Channi
Ranveet Singh Bittu, Charanjit Singh ChanniSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत अर्थसंकल्पावरून चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे खासदार एकमेकांना भिडले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंह चन्नी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता.

चन्नी यांचे अर्थसंकल्पावर भाषण सुरू असताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच बिट्टू यांच्यावर वैयक्तिक टीका केली. चन्नी म्हणाले, ‘तुमचे आजोबा शहीद झाले होते. पण त्यांचा मृत्यू त्यावेळी झाला नाही तर तुम्ही काँग्रेस सोडल्यानंतर झाला.’ चन्नी यांच्या या विधानावर बिट्टू चांगलेच संतापले.

Ranveet Singh Bittu, Charanjit Singh Channi
Rajya Sabha Session : कुलकर्णींचं भाषण, प्रियांका चतुर्वेदींचं स्मितहास्य अन् पटेलांचा संताप; राज्यसभेत महाराष्ट्र गाजला...

बिट्टू यांचे आजोबा बेअंत सिंह पंजाबचे माजी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचे हत्या करण्यात आली होती. बिट्टू म्हणाले, माझ्या आजोबांनी देशासाठी जीव दिला, काँग्रेससाठी नाही. गरिबीवर बोलणारे चन्नी पंजाबमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. सर्वात भ्रष्टाचारी आहेत. तसे नसेल तर मी माझे नाव बदलेन, असे आव्हान त्यांनी दिले.

बिट्टू यांच्या टिकेनंतरही चन्नी यांनी बोलणे सुरू ठेवल्यानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यही उठून उभे राहिले. काही सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले. मग काँग्रेसचे पंजाबमधील काँग्रेसही आक्रमक झाले. यादरम्यान बिट्टू त्यांच्या दिशेने धावून गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना रोखले. संसदेत मोठा गदारोळ सुरू झाल्यानंतर काही मिनिटांसाठी कामकाज स्थगित करावे लागले.

Ranveet Singh Bittu, Charanjit Singh Channi
Lok Sabha Session : केंद्रीय मंत्र्यांचे थेट लोकसभेतच काँग्रेस खासदाराला चहाचे आमंत्रण; ओम बिर्लांनी सुनावलं...

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल यांनी बिट्टू यांच्या विधानावर आक्षेप घेत माफी मागण्याची विनंती केली. ते काँग्रेस खासदारांवर हल्ला करण्यासाठी धावून आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर राजनाथ सिंह आणि अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सदस्यांना शांत राहून संसदेची प्रतिष्ठा अबाधित राखण्याचे आवाहन केले. 

दरम्यान, बिट्टू हे लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेले आहेत. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी ते काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा खासदार झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com