
Mark Zuckerberg statement News : सोशल मीडिया कंपनी METAने आपले CEO मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. झुकरबर्गने एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, करोनानंतर जगभरातील अनेक विद्यमान सरकारं पडतील. भारतामधील लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचा पराभव झाला, यावरून जनतेचा सरकारवरील विश्वास कमी होत चालला आहे हे दिसून येते.
झुकरबर्गच्या या वक्तव्यानंतर संसदेच्या आयटी समितीचे अध्यक्ष आणि भाजप(BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले होते की, या वक्तव्यावर कंपनीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा आमची समिती त्यांना मानहानीचा नोटीस पाठवेन. यावर META इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी बुधवारी म्हटले की, हा एक निष्काळजीपणा होता. मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले की करोनानंतर अनेक विद्यमान सरकारं पडली, परंतु असं भारतात घडलं नाही. आम्ही निष्काळजीपणातून झालेल्या या चुकीबद्दल माफी मागतो आहोत. भारत METAसाठी अतिशय महत्त्वपूर्ण देश आहे.
मार्क झुकरबर्ग जो रोगन सोबत एका पॉडकास्टमध्ये कोविड-19 महामारीनंतर सरकारांवरील विश्वास कमी होत असल्याबाबत बोलत होते. या दरम्यान त्यांनी म्हटले की, '2024 एक मोठे निवडणूक वर्ष होते. भारतासह या सर्व देशांमध्ये निवडणूक होती, जवळपास सर्वच सत्ताधारी निवडणूक हारले. संपूर्ण वर्षात कोणत्या न कोणत्याप्रकारची जागतिक घटना घडली. मग ते आर्थिक धोरणांमुळे असेल.'
तसेच, 'कोविडचा सामना करण्यासाठी आर्थिक धोरणांच्या कारणामुळे किंवा सरकारने कोविडशी निपटण्यासाठी अवलंबवलेल्या पद्धतीमुळे असं वाटतंय की याचा प्रभाव जागतिक होता. लोकांची नाराजी आणि संतपाने जगभरातील निवडणुकींच्या निकालांवर परिणाम झाला. सर्वच सत्ताधारी लोक पराभूत झाले. नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वातील सरकारही पराभूत झाले.'
झुकरबर्ग यांनी व्हॉट्स अॅपबाबत म्हटले की एंड टू एंड एन्क्रिप्शन यूजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करते. परंतु जर एखाद्या सरकारी एजन्सीला डिव्हाइस पर्यंत पोहच मिळाली तरी ते त्यात स्टोर चॅटही वाचू शकतात. तसेच त्यांनी म्हटले की, जर एखाद्या डिव्हाइसमध्ये पेगॅसस सारखे स्पायवेयर इंस्टॉल आहे, तर एजन्सी त्याच्या कंटेट पर्यंत पोहचू शकतात. धोके लक्षात घेता व्हॉट्स अॅपने डिसअपीयरिंग मेसेज फिचरही समाविष्ट केले आहे, जे चॅट एका ठारविक वेळेनंतर आपोआप डिवाइसमधून डिलीट करते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.