Smriti Irani : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या स्मृती इराणींना भाजपने दिली मोठी जबाबदारी!

Smriti Irani gets new responsibility : जाणून घ्या, माजी केंद्रीयमंत्री राहिलेल्या स्मृती इराणींना आता भाजप श्रेष्ठींनी कोणती नवीन महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे?
Smriti Irani
Smriti IraniSarkarnama
Published on
Updated on

Smriti Irani in PMML Society: पंतप्रधान संग्रहालय व पुस्तकालय(पीएमएमएल) सोसायटी आणि कार्यकारी परिषद मंगळवारी पुर्नगठीत केली गेली. ज्यामध्ये अनेक नवीन सदस्य सहभागी करून घेण्यात आले. पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा यांना पुन्हा एकदा कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष बनवले गेले.

यावेळी अनेक प्रमुख नावं पीएमएमएलच्या सोसायटीत समाविष्ट झाली आहेत. यामध्ये माजी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani ), नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार, सेवानिवृत्त जनरल सय्यद अता हसनैन, प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि संस्कार भारतीचे वासुदेव कामत यांचा समावेश आहे. हे लोक संस्थेत आपआपले विविध अनुभव आणि विशेषज्ञता घेवून येतील. जे पीएमएमएलच्या विकासाला एक नवीन दिशा देतील. पंतप्रधान मोदी सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष राहतील.

सोसायटीच्या सदस्यांची संख्या देखील 29 पेक्षा वाढून 34 करण्यात आली आहे. हा विस्तार संस्कृती मंत्रालयाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या पुनर्गठीत आदेशानुसार करण्यात आला आहे. नवीन सोसायटी आणि परिषदेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

काही जुन्या सदस्यांना पुनर्गठनात बाहेर करण्यात आले आहे. यामध्ये माजी केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur), विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष राम बहादूर राय आणि पत्रकार रजत शर्मा यांचा समावेश आहे.

Smriti Irani
JP Nadda : नड्डांकडून राहुल गांधींचे आधी कौतुक अन् नंतर टीकेचे बाण; एका विधानाने वादाची ठिणगी

पीएमएमएल सोसायटीत आता राष्ट्रीय विकासात योगदान देणारी अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व सहभागी आहेत. यामध्ये पंतप्रधानांचे आर्थिल सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे शिक्षणतज्ञ चामू कृष्ण शास्त्री यांचा समावेश आहे. याशिवाय पुरात्वविद् के.के.मोहम्मद जे १९७६ मध्ये बाबरी मशिदीच्या उत्खनन दलाचा भाग होते आणि राष्ट्रीय संग्रहालयाचे विद्यमान प्रमुख बीआर मणि देखील सोसायटीचा भाग झाले आहेत.

Smriti Irani
Rahul Gandhi vs RSS : 'दुसऱ्या कोणत्याही देशात अटक झाली असती', राहुल गांधींचा मोहन भागवतांवर हल्लाबोल

२०२३मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्रेरी(एनएमएमएल)चे नाव बदलून पीएमएमएल केल्यानंतर ही नवीन सोसायटीसाठी पहिली औपचारिक अधिसूचना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आधी भारतीय पंतप्रधांनाना समर्पित एक संग्रहालय बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि 2022मध्ये याचे उद्धाटन झाले. या संग्रहालयाचे उद्दिष्ट देशाच्या नेतृत्वाचा वारसा संरक्षित करणे आणि तो प्रस्तुत करणे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com