Karnataka Congress News: मंत्र्यांनी अडीच वर्षांनंतर राजीनामे द्यावेत; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने अशी सूचना का केली?

Ministers Resign After Two & Half Years: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमच्या हातात नाही, त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडचा आहे.
K. H. Muniyappa
K. H. MuniyappaSarkarnama
Published on
Updated on

Bangalore Marathi Political News: कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी काही दिवसांपूर्वी आपल्याच मंत्र्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ती गोष्ट दिल्लीत हायकमांडपर्यंत पोचली होती. पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना कानपिचक्या देत तो वाद शमवला होता. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी तोडगा सुचविला आहे. (Ministers should resign after two and a half years: K. H. Muniyappa)

कर्नाटक राज्य मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांनी अडीच वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी इतर आमदारांना संधी उपलब्ध करून द्यावी, असा उपाय मुनियप्पा यांनी प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत सांगितला आहे. आता यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे.

K. H. Muniyappa
Praniti Shinde On Loksabha Candidature: सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमच्या हातात नाही, त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडचा आहे. पण, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अडीच वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हे माझे वैयक्ती आहे. काँग्रेस संघटनेसाठी चार ते पाच वर्षे काम केलेल्या जिल्हाध्यक्षांना महामंडळावर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी. काही तालुकाध्यक्षांवर ही जबाबदारी सोपवावी, असे सूचना मंत्री मुनियप्पा यांनी केली.

K. H. Muniyappa
Abhimanyu Pawar Become Minister : फडणवीसांच्या मर्जीतील अभिमन्यू पवार मंत्री होणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूतोवाच

या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री वीराप्पा मोईली यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भाजपच्या विरोधात लढण्यासाठी देशपातळीवर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. इंडिया आघाडीला कर्नाटकातूनही भरभक्कम पाठिंबा मिळायला हवा. मंत्री, महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी किरकोळ मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com