MK Stalin vs Fadnavis : CM फडणवीसांवर स्टॅलिन चांगलेच भडकले; सौदेबाजी अन् ब्लॅकमेल, असे शब्द वापरत केला पलटवार

Tamil Nadu election politics : भाजपचा आमदार निवडून दिलात तरच मदुराईला मेट्रो देऊ, अशी सौदेबाजी आणि ब्लॅकमेल करणे हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे काम आहे का?, असा सवाल स्टॅलिन यांनी केला.
MK Stalin, Devendra Fadnavis (AI Image)
MK Stalin, Devendra Fadnavis (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

BJP vs DMK clash : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच तमिळनाडूच्या दौऱ्यावर होते. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून फडणवीस यांनीही काही उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी डीएमके सरकारवर जोरदार आरोप करत डबल इंजिन सरकारचा हवाला दिला होता. मदुराई मेट्रोबाबत केलेल्या विधानामुळे मात्र तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलन त्यांच्यावर चांगलेच भडकले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

भाजपचे मदुराईतील उमेदवार रामा श्रीनिवासन यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच दाखल केला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी भाजपचा उमेदवार विजयी झाला तरच मदुराईत मेट्रो येईल, असे विधान केले होते.

श्रीनिवासन हे विजयी झाल्यानंतर आम्ही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जाऊ. मुदराई शहरावर पंतप्रधानांचा किती जीव आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे रामा श्रीनिवासन हे मोदींकडे गेल्यानंतर मुदराईत मेट्रो पोहचेल, याची खात्री देतो, असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले होते. फडणवीस यांनी वाढत्या गुन्हेगारीवरूनही सरकारला घेरले होते.

MK Stalin, Devendra Fadnavis (AI Image)
NCP leader murder case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकाला जन्मठेप; हायकोर्टाने 23 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सुनावली शिक्षा

स्टॅलिन यांचा पलटवार

फडणवीस यांच्या विधानाला स्टॅलिन यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपचा आमदार निवडून दिलात तरच मदुराईला मेट्रो देऊ, अशी सौदेबाजी आणि ब्लॅकमेल करणे हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे काम आहे का?, असा सवाल स्टॅलिन यांनी केला.

संविधानाची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यानी विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्यात येऊन असे बोलणे लाजिरवाणे आहे. केंद्र सरकारकडून निधी वाटपात दुर्लक्ष होऊनही तमिळनाडू सरकारने उल्लेखनीय योजना राबवल्या आहेत, हे त्यांना माहिती आहे का? माहिती नसेल तर आधी विचारून समजून घेऊन मग बोलावे, असा टोलाही स्टॅलिन यांनी लगावला.

MK Stalin, Devendra Fadnavis (AI Image)
Jagdeep Dhankhar news : जगदीप धनखड यांनी चक्रं फिरवली अन् भाजपचा पराभव? तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकीय समीकरणं बदलली...

तुम्ही ज्या “डबल इंजिन”ची स्तुती करता, त्या राज्यांनाही मागे टाकत, ‘द्रविडीयन मॉडेल’ अंतर्गत चालणाऱ्या तमिळनाडूनेच दुहेरी अंकातील आर्थिक वाढ साध्य केली आहे, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. दरम्यान, सत्ताधारी डीएमकेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपसह एआयडीएमकेने ताकद पणाला लावली आहे. फडणवीस यांच्यासह भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांतील मुख्यमंत्री तमिळनाडूमध्ये प्रचार करत आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com