
Mumbai News : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगावांतील जमिनींवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले आहेत. त्यांनी सोमवारी सोशल मीडियातून आपली भूमिका स्पष्ट केली. ही बातमी धक्कादायक असल्याचे सांगत ठाकरेंनी केंद्र सरकारलाही विनंती केली आहे. वक्फ बोर्डाचा सुधारित कायदा याच अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले असले तरी हे पुरेसे नाही, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रश्न या जमिनीपुरता नाही तर वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय, त्याला चाप कसा बसवणार हा आहे?
काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे.
कायद्यातील सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नसल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात 70 कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी, अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता.
विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं, अशी विनंती राज ठाकरेंनी केंद्र सरकारला केली आहे. राज्य सरकारनेही अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं, असे आवाहनही ठाकरेंनी केले आहे.
राज ठाकरेंनी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीचे उदाहरण देत वक्फ बोर्डाला आवाहन केले आहे. भूदान चळवळीत जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानेही दाखवावा. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा, यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.