Mallikarjun Kharge : मोदींनी फिरकी घेतल्यानंतर खर्गेंनी सोडले बाण; ते ‘5’ मुद्दे खोडून काढले...

PM Narendra Modi Parliament Session Rajya Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.
Narendra Modi, Mallikarjun Kharge
Narendra Modi, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी काँग्रेस सरकारच्या काळातील अनेक मुद्दे मांडत जोरदार निशाणा साधला होता. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचीही फिरकी घेतली होती. त्यानंतर खर्गेंनीही मोदींच्या भाषणावर पलटवार केला आहे. मोदींचे ते पाच महत्वाचे मुद्दे खर्गेंनी खोडून काढले आहेत.

खर्गेंनी सोशल मीडियात एक पोस्ट करत मोदींवर निशाणा साधला आहे. जो व्यक्ती केवळ इतिहासात रमतो, तो वर्तमान आणि भविष्य काय निर्माण करणार, असा सवाल त्यांनी केला आहे. या सरकारच्या हातात देशाच्या भविष्य अंधकारमय आहे. त्यांनी दलित, आदिवासी, मागासवर्ग, अल्पसंख्यांग वर्ग, गरीबांच्या योजनांविषयी बोलण्याऐवजी सभागृहाची दिशाभूल करण्याचे काम केल्याची टीका खर्गेंनी केली.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Delhi Election 2025 : निकालाआधीच दिल्लीत 'ऑपरेशन लोटस'ला सुरूवात? आपच्या 16 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर, केजरीवालांचा गंभीर आरोप

मोदींनी संविधानातील पहिल्या दुरूस्तीवरून टीका केली होती. ते खोडून काढताना खर्गे म्हणाले, संविधानातील पहिली दुरुस्ती मागास जातींना आरक्षणासाठी आणि जमीनदारी संपविण्यासाठी करण्यात आली होती. याच दुरुस्तीमुळे संविधानात 9 वे परिशिष्ट, कलम 15 (4) जोण्यात आले. ज्यामुळे एससी, एसटी आणि नंतर ओबीसींना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळू शकले, असे खर्गेंनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने मुंबईतून संविधान सभेत आणण्यासाठी एम. आर. जयकर यांचा राजीनामा घेतला होता. पंडित नेहरूंच्या सरकारमध्ये ते पहिले कायदामंत्री बनले. डॉ. आंबेडकरांनी पत्र लिहून खुलासा केला होता की, त्यांच्या पराभवाला एस. ए. डांगे आणि सावरकर जबाबदार होते, असेही खर्गेंनी स्पष्ट केले आहे.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Mahakumbh News : 'महाकुंभ'मध्ये पाकिस्तान, चीन अन् बांगलादेश बाबत पारित झाले महत्त्वपूर्ण प्रस्ताव!

काँग्रेसनेच उदारीकरण आणलले. हे काम इंदिरा गांधींपासून सुरू होत राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी ते यशस्वी केले. त्यामुळे भारत जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडला गेला. इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ कार्यक्रमातून गरिबी कमी झाली. 1980 ते 1985 दरम्यान 21 टक्के लोक बीपीएल होते. केवळ पाच ते यातून बाहेर आले. एकट्या काँग्रेस-यूपीएने 27 कोटी लोकांना बीपीएलमधून बाहेर आणल्याचा दावाही खर्गेंनी केला आहे. देशाला धोका देण्याची चूक मोदींनी मान्य केल्याचेच त्यांच्या भाषणातून दिसत असल्याचेही खर्गेंनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com