Mahakumbh News : 'महाकुंभ'मध्ये पाकिस्तान, चीन अन् बांगलादेश बाबत पारित झाले महत्त्वपूर्ण प्रस्ताव!

Mahakumbh Resolutions regarding Pakistan, China and Bangladesh : जाणून घ्या, काय आहेत प्रस्ताव आणि नेमके कोणी पारीत केले आहेत? ; महाकुंभ मेळ्यावर अवघ्या जगाचे लक्ष आहे.
Mahakumbh
Mahakumbh Sarkarnama
Published on
Updated on

Prayagraj Mahakumbh Mela : प्रयागराज महाकुंभमधून जगाला सनातन बौद्ध एकतेचा संदेश दिला गेला आहे. या महाकुंभ मेळ्यात जगभरातील अनेक देशांमधून भंते, लामा, बौद्ध भिक्षु आणि सनातन धर्माचार्य सहभागी झाले आहेत. ''बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघम् शरणम गच्छामी'' हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने बुधवारी बौद्ध भिक्षुंनी शोभायात्रा काढली. यात्रेचा समारोप जूना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानन्द गिरींच्या प्रभू प्रेमी शिबिरात झाला.

याप्रसंगी महाकुंभात तीन प्रस्ताव पारीत केले गेले. पहिल्या प्रस्तावात बांगलादेश, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर अत्याचार बंद करण्याची मागणी केली गेली. दुसऱ्या प्रस्तावात तिबेटला स्वायत्तता देण्याची मागणी आहे आणि तिसऱ्या प्रस्तावाचा संबंध सनातन अन् बौद्ध एकतेशी आहे. प्रभू प्रेमी शिबीरमात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी म्हटले की, प्रयागराज महाकुंभातून संगम, समागम आणि समन्वयाचा संदेश संपूर्ण जगात गेला पाहीजे.

Mahakumbh
Delhi Election Voting Percent : दिल्लीत 'पिक्चर अभी बाकी है'! 2 टक्के मतदान घटल्याचा कोणाला होणार फायदा?

त्यांनी म्हटले की, कुंभाचा तीन शब्दांशी संबंध आहे. जो कोणी येथे येतो त्याची संगमात स्नानाची इच्छा असते. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो, तेव्हा फरक दिसत नाही. संगामाच्या आधी वेगवेगळे प्रवाह आहे, मात्र संगमाचा संदेश आहे की येथून पुढे एकच प्रवाह चालेल.

तिबेटच्या संरक्षण मंत्र्यांनी काय म्हटले? -

भय्याजी जोशी यांनी म्हटले की, विविध प्रकारची मत-मतांतर असणारे सर्व श्रेष्ठ संत येथे येवून आपसात भेटून संवाद साधतात, चर्चा करतात. त्यांचे म्हणणे होते की संत एकत्र आले तर सर्वसामान्य लोकही एकसाथ चालतील. कार्यक्रमास संबोधित करताना निर्वासित तिबेटच्या संरक्षणमंत्री डोलमाहम यांनी म्हटले की, सनातन व बौद्ध धर्मात ज्याप्रकारची प्रेम भावना, जवळीक असायला हवी त्या दिशेने फार मोठं पाऊल या पवित्र भूमीवर उचलण्यात आलं आहे.

Mahakumbh
Operation Lotus in Delhi : ''दिल्लीत निकालाआधीच 'Operation Lotus' झालं सुरू'' ; 'AAP'च्या बड्या नेत्याचा दावा!

म्यानमारहून आलेले भंते काय म्हणाले ? -

म्यानमारहून आलेले भदंत नाग वंशा यांनी म्हटले की, मी पहिल्यांदाच महाकुंभमध्ये आलो आहे. बौद्ध आणि सनातनमध्ये खूपच साम्य आहे. आम्ही लोक विश्वशांतीसाठी काम करतो. आम्ही भारत आणि येथील लोकांना आनंदी बघू इच्छितो. भारत सरकार बौद्ध धर्माचे कार्य करण्यात सहकार्य करते. आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे आभार मानत आहोत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

इंद्रेशकुमार म्हणाले - सनातनच बुद्ध आणि बुद्धच सत्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी म्हटले की, सनातनच बुद्ध आहे. बुद्धच शाश्वत व सत्य आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, भारताकडे युद्ध नाही बुद्ध आहे. आपण एक राहिलो तर एक नवीन भारत आणि एक नवीन जग उदयास येईल, जे युद्धमुक्त, अस्पृशतामुक्त, गरिबीमुक्त असेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com