Pakistan Military Attack : पाकिस्तानाच्या लष्करी वाहनांवर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 90 जवान ठार झाल्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीकडून (Baloch Liberation Army) केला जात आहे. पाकिस्तानातील क्वेटा येथून तफ्तानकडे जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर रविवारी (ता.16) मोठा दहशतवादी हल्ला झाला.
या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले असून 21 जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan Army) ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी BLA ने घेतली आहे. क्वेट्टापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या नोशकीमध्ये हा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसरात हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचा ताफा तफ्तानकडे जात होता. या ताफ्यात लष्कराच्या 7 बससह आणखी 2 वाहने होती. या वाहनांमध्ये आयईडीने भरलेले वाहन घुसवत आत्मघाती हल्ला केल्याचं आता समोर आलं आहे.
नोशकी स्टेशनचे एसएचओ जफुरुल्ला सुलेमानी यांनी सांगितलं की, प्राथमिक अहवालानुसार हा आत्मघाती हल्ला होता. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून हल्लेखोराने जाणूनबुजून त्याचे स्फोटकाने भरलेले वाहन लष्कराच्या ताफ्याच्या घुसवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर या हल्ल्यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या आत्मघाती युनिट मजीद ब्रिगेडने नोशकी येथील आरसीडी हायवेवर पाकिस्तानी लष्करावर आत्मघाती हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसंच या हल्ल्यात एकूण 90 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा बीएलए ने केला आहे.
दरम्यान, नुकतंच बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील 30 जवान ठार करत रेल्वेतील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. त्यानंतर बीएलएने पुन्हा दुसरा मोठा हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.