New Delhi News: केंद्र सरकारकडून स्वातंत्र्य दिनाच्या पू्र्वसंध्येला मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी(ता.14) आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची ईडीचे नवे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ईडीच्या नवीन संचालकांच्या नावाची घोषणा केली आहे.ते नवीन ईडी संचालक संजय कुमार मिश्रा यांची जागा घेणार आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची ईडीचे नवे संचालक म्हणून नियुक्ती केली. ते दोन वर्षे या पदावर राहणार आहेत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. याविषयी 'एएनआय'कडून माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) प्रमुखपदी नियुक्ती केलेल्या राहुल नवीन यांची नियुक्ती केली आहे.तब्बल 11 महिन्यानंतर ईडीला आता पूर्णवेळ संचालक मिळाला आहे.नवीन हे भारतीय सेवेच्या 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीची बुधवारी बैठक पार पडली.याच बैठकीत राहुल नवीन यांच्याकडे ईडीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते संचालकपदी नियुक्ती होण्याआधी सक्तवसुली संचालनालय संस्थेत विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. जवळपास प्रभारी संचालकपदाची जबाबदारी ते गेल्या अकरा महिन्यांपासून सांभाळत होते. देशभरात स्वातंत्र्यदिनाची लगबग सुरू असतानाच मोठा निर्णय घेण्यात आला.
केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सक्तवसुली संचालनालय(ईडी)ही तपासयंत्रणा चांगलीच चर्चेत आली आहे. ईडीने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचा दावा स्वत:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केला होता.
पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून टार्गेट करण्यात येत असल्याचा आणि तपासयंत्रणांचा गैरवापर विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप मोदी सरकारवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून केला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.