Bihar CM Nitish Kumar : नितीशबाबूंचे मोदी-शाहांवर प्रेशर; दिल्लीत ‘अग्नी’ भडकणार

Lok Sabha Election 2024 Result Bihar CM Nitish Kumar Agniveer Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्या टर्ममध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
Nitish Kumar PM Narendra Modi
Nitish Kumar PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Modi Governemnt : पंतपधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्मसाठी शपथ घेण्याआधीच एनडीएमध्ये प्रेशर पॉलिटिक्स सुरू झाले आहे. त्यामध्ये भाजपसाठी सर्वाधिक धोकादायक राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आघाडी घेतली आहे. नव्या सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी नितीशबाबूंनी नाक दाबण्यास सुरूवात केली आहे.

मोदी सरकारची ‘अग्निवीर’ ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा सरकारने जोरदार प्रचार केला. पण प्रत्येक निवडणुकीत त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. उलट बिहार आणि उत्तर प्रदेशात या योजनेमुळे एनडीएला फटका बसल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचेच पडसाद आता नव्या सरकारमध्येही उमटण्याची चिन्हे आहेत.

अग्नवीर योजनेचा नव्याने विचार करण्याबाबत नितीश कुमार आग्रही असल्याचे समजते. त्याचप्रमाणे समान नागरी कायद्याबाबतही अनेक संभ्रम असल्याने त्यावरही व्यापक चर्चा होण्याची गरज नितीश कुमारांना वाटते. मात्र त्यांनी एक देश-एक निवडणूक या अजेंड्याला पाठिंबा दिल्याचे समजते.

Nitish Kumar PM Narendra Modi
Amritpal Singh-Sheikh Abdul Rasheed : निवडून आलेले ‘हे’ दोन खासदार कोठडीतच राहणार

अग्निवीर आणि युसीसीला निवडणुकीआधापासूनच जोरदार विरोध होत आहे. काँग्रेस व मित्रपक्षांनी सत्ता आल्यास ही योजना रद्द करण्याची घोषणा केली होती. बिहार, उत्तर प्रदेशातील प्रत्येक सभेत राहुल गांधी यांच्याकडून अग्निवीरचा उल्लेख केला जात होता. तरुणांना व्यासपीठावर बोलवून ते विचारपूस करत होते. याचा मोठा परिणाम, मतदानावर झाल्याने उत्तर प्रदेशात एनडीएची वाताहात झाल्याचे बोलले जात आहे.

नितीश कुमार यांनी हीच स्थिती विचारात घेऊन आपली मागणी पुढे रेटल्याचे समजते. त्याचप्रमाणे कॅबिनेटमध्ये अधिक मंत्रिपदे पदरात पाडून घेण्यासाठी हे प्रेशर पॉलिटिक्स असल्याचेही सांगितले जात आहे. अग्निवीर ही मोदी सरकारची महत्वाची योजना असल्याने त्यापासून माघार घेणे, सरकारला नामुष्की ठरू शकते. त्यामुळे या योजनेत काही बदल करण्याचा विचारही सरकारकडून केला जाऊ शकतो. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com