Caste Cenus: मोदी सरकारचा बिहारच्या निवडणुकीआधी सर्वात मोठा स्ट्राईक; जातनिहाय जणगणनेबाबत उचललं मोठं पाऊल

Modi Government On Caste Cenus : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडून संसदेत जातनिहाय जनगणनेची जोरदार मागणी करण्यात येत होती. काहीही झाले तरी ही जनगणना व्हायलाच हवी,असं त्यांनी सरकारला सांगितलं होतं.
Caste Census
Caste CensusSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी देशभरात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता.या मुद्द्यामुळेच एरवी कणखर भूमिकेत विरोधकांवर तुटुन पडणारे मोदी सरकार काहीसे बॅकफूटला गेले होते. पण बिहार विधानसभा निवडणुकीआधीच मोदी सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.30) केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रातील एनडीए सरकारची ही पहिलीच बैठक होती.त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचेंच लक्ष लागलेले होते. याचदरम्यान, मोदी सरकारनं जातनिहाय जनगणना ( (Caste Cencus )करण्याचा मोठा निर्णय घेत विरोधकांना चांगलाच धक्का दिला आहे

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. याच निर्णयांमध्ये जातिनिहाय जनगणनेच्याही निर्णयाचाही समावेश आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे

Caste Census
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी सरकारचा रेटा; सांगली-सावंतवाडीत कोणत्याही क्षणी जमीन मोजणी!

अश्विनी वैष्णव म्हणाले,देशात 1947 नंतर आजपर्यंत जातनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. याआधी काँग्रेसकडून जातनिहाय जनगणनेऐवजी जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यूपीए सरकारच्या काळात काही राज्यांनी राजकीय दृष्टीकोनातून जातनिहाय सर्वेक्षण केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जातनिहाय जनगणना काँग्रेस आणि इंडिया आघाडी आपल्या लाभापर्यंत मर्यादित ठेवण्यात येत होतं. पण जातनिहाय जनगणना मूळ जनगणनेत समाविष्ट झाली पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट अफेअर्सच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला आगामी काळातील जनगणनेत समाविष्ट करण्यात येईल.असंही मंत्री वैष्णव यांनी यावेळी सांगितलं.

Caste Census
Satara Politics : भावाच्या मदतीने जयकुमार गोरेंचा राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग; बाजी पलटवणारे शेखर गोरे आता 'किंग मेकर'

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडून संसदेत जातनिहाय जनगणनेची जोरदार मागणी करण्यात येत होती. काहीही झाले तरी ही जनगणना व्हायलाच हवी,असं त्यांनी सरकारला सांगितलं होतं. जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणांतील प्रचार सभांमध्येही जातनिहाय जणगणनेचा मुद्दा तापवण्यात आला होता. त्याचमुळे भाजप व मित्रपक्षांच्या एनडीए सरकारला अखेर विरोधकांच्या या मुद्द्याची दखल घ्यावी लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com