Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी सरकारचा रेटा; सांगली-सावंतवाडीत कोणत्याही क्षणी जमीन मोजणी!

Sangli/Sawantwadi Shaktipeeth Highway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पण तो रेटण्याचे काम राज्य सरकार करत आहे.
 Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwaySarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli/Sawantwadi News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जमीन मोजणीच्या कामाला गती आली असून जेथे अडचण आहे. तेथे नोटीस काढली जात आहे. याआधी विरोध असणाऱ्या सांगली आणि सावंतवाडी जिल्ह्यात संबंधीतांना जमीन मोजणीच्या नोटीस काढण्यात आल्या असून आता प्रत्यक्ष मोजणीला सुरूवात होणार आहे.

सावंतवाडीत 17 मेपासून मोजणी

शक्तिपीठ महामार्गाच्या विकासकामांना वेग आला असून महामार्गासाठी लाणाऱ्या जमिनीची मोजणी 17 मेपासून सावंतवाडी जिल्ह्यात सुरू होणार आहे. तर यासंबधीत डेगवे तलाठी कार्यालयाने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. कार्यालयाने संबंधीत व्यक्तींना नोटीस काढत मोजणीच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. तर 17 मे रोजी सकाळी साडेनऊपासून होणाऱ्या मोजणीला आप आपल्या सर्व्हे नंबरमध्ये उपस्थित राहावे, असे म्हटलं आहे. तर या मोजणीनंतर जमिनी संपादन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आता या मोजणीला याआधीच विविध संघटनांनी विरोध केला असून प्रत्यक्ष मोजणीदिवशी जमीन मोजणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यात कोणत्याही क्षणी महामार्गासाठी जमिनीची मोजणीला सुरूवात होणार आहे. याला आधीच शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र गरज पडल्यास पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्याची तयारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने केली आहे. याबाबत मंगळवारी (ता. 29) जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे महत्वाची बैठक झालीय. मिरज आणि विटा प्रांताधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती झाली असून महामंडळाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीचे शुल्क भरले आहे.

 Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठासाठी 'रात्रीचा खेळ चाले', मनसेचा हल्लाबोल; विरोध करण्याचा निर्धार

शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगावं, मिरज आणि आटपाडी तालुक्यातून जाणार असून तो 19 गावातून जाईल. या चारही जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 611 शेतकरी बाधित होणार असून त्यांच्या 616.67 हेक्टर जमीन जाणार आहे.

 Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'च्या मोजणीला महिला सरपंचाचा दणका; ठाकरेंची शिवसेनाही सर्व्हेविरोधात

दरम्यान शक्तिपीठ महामार्गाविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे निमंत्रक दिंगबर कांबळे यांनी दिला होता. त्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी पक्षाने केली होती. महामार्गाविरोधात गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारला याचे काहीही पडलेले नाही. त्यामुळे आता 1 मे पासून या महामार्गाविरोधात अन्नत्याग आंदोलन केले जाईल असा इशारा दिंगबर कांबळे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.