Nanded Hospital News
Nanded Hospital NewsSarkarnama

Nanded Hospital News: मोठी बातमी! नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; सुमोटो याचिका दाखल

High Court : राज्यात दोन दिवसांत 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Published on

Mumbai News: नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी तब्बल 24 रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर 24 रुग्णांच्या मृत्यूनंतर पुन्हा सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या घटनेवर गुरुवारी तातडीची सुनावणी होणार आहे. राज्य महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना या प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Nanded Hospital News
Pankaja Munde Sugar Factory : पंकजा मुंडेंच्या अडचणीत राज्यभरातून मदतीचा ओघ; पण उद्योगनगरीतील समर्थक कधी धावून जाणार?

तसेच मनुष्यबळाची कमतरता, औषधांची टंचाई अशा कारणांनी मृत्यू होत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असे न्यायालयाने सुनावले आहे. त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकार या घटनेप्रकरणी काय भूमिका स्पष्ट करते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, नांदेडच्या रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. नांदेडसह संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडूनदेखील दखल घेण्यात आली होती.

Edited By- Ganesh Thombare

Nanded Hospital News
Gram Panchayat Election: गाववाड्यातील राजकारण तापणार ? कोल्हापूर-सांगलीतील 183 ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com