Shivsena Politics: ठाकरेंच्या शिलेदारांमागे पोलिसांचा ससेमिरा...आता माजी नगरसेवकावर दरोडयाचा गुन्हा!

Shivsena politics; police file case against Shivsena ubt leader Pawan Pawar-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या आणि तडीपार माजी नगरसेवकाच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा
Pavan Pawar
Pavan PawarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सत्ताधारी गटाच्या नेत्यांतील एकमेकांवर कडी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकावर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केल्याने तो चर्चेचा विषय आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रताप शिवाजी चुंभळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री चुंबळे यांच्या कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्री पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने प्रवेश करून तोडफोड केली होती. यावेळी सुरक्षारक्षकालाही मारहाण करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.

Pavan Pawar
Raj Thackrey Politics: विधानसभेच्या अपयशानंतर महापालिकेसाठी `मनसे`ची राज ठाकरेंवर भिस्त!

या संदर्भात पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात कार्यालयातील एक लाख ७० हजार रुपये रोख आणि कागदपत्रांसह अन्य काही साहित्य चोरून नेल्याचा आरोप आहे. यामध्ये सीसीटीव्ही आणि अन्य काही साहित्याचाही समावेश आहे. कार्यालयातील काही साहित्याची तोडफोड करण्यात आली.

Pavan Pawar
Aamshya Padvi Politics: एकनाथ शिंदे यांच्या `या` आमदारासह १०० जणांविरोधात पोलिसांची कारवाई...

हा वाद जमिनीच्या खरेदी विक्रीतील आहे. देवळाली कॅम्प येथील एका संस्थेची जमीन चुंबळे यांनी भागीदारीने खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदीतील अन्य घटकांकडून त्याबाबत वाद सुरू होता. या वादासाठीच माजी नगरसेवक पवन पवार हे चुंबळे यांच्या कार्यालयात गेले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा बोलले जाते.

विशेष म्हणजे नाशिक शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या विविध नेत्यांवर पोलिसांनी गुन्ह्यांचा ससेमीरा लावला आहे. त्यामुळे अनेक नेते या राजकीय डावपेचांचा बळी पडले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या चिरंजीवासह अन्य काही नेत्यांवर देखील अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई केली होती.

विशेष म्हणजे माजी नगरसेवक पवन पवार यांनी नुकतेच शिवसेना ठाकरे पक्षात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रवेश केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांना १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधी करता शहरातून तडीपार केले होते. तडीपारीची कारवाई सुरू असतानाच बावीस नोव्हेंबरला ही घटना घडल्याचे पोलिसात नोंद आहे. त्यामुळे तडीपार असतानाच दुसरा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या कार्यवाही बाबतही चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे वाद अधिक वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यात अशा अनेक घटना घडल्या होत्या. त्यात पोलिसांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांना लक्ष केले होते. माजी नगरसेवक पवार यांसह विशाल पवार, रामेश्वर पटेल, युवराज मोरे, नाना पगारे यांच्या विरोधात पोलिसांनी ही कारवाई केली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com