बाबा राम रहीमचा 'व्हीआयपी' थाट! सुरक्षेसाठी सहआयुक्त, डीसीपी, एसीपींसह 300 जवान

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला आहे.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram RahimSarkarnama

चंडीगड : पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियानातील भाजप सरकारने त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली आहे. राम रहीमच्या सुरक्षेच्या थाट व्हीआयपीलाही लाजवेल असा आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सहपोलीस आयुक्त, उपायुक्त (DCP), सहाय्यक आयुक्तांसह (ACP) तब्बल 300 जवान तैनात करण्यात आले आहेत. (Gurmeet Ram Rahim News)

राम रहीम हा सध्या त्याच्या गुडगावमधील डेऱ्यात मुक्कामाला आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला तुरुंगातून डेऱ्यात आणण्यात आले. राम रहीमच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक उदयसिंह मीना त्याआधी तीनवेळा उच्चस्तरीय बैठका घेतल्या होत्या. राम रहीमचा हा डेरा साऊथ सिटीमध्ये आहे. राम रहीमच्या सुरक्षेसाठी 300 जवान तैनात करण्यात आले आहेत. यातील प्रत्येकी 100 जवान 8 तासांच्या शिफ्टमध्ये बंदोबस्ताठी असतील.

राम रहीमच्या सुरक्षेची जबाबदारी सहपोलीस आयुक्तांवर असून, त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तही आहेत. हे वरिष्ठ अधिकारी राम रहीमच्या सुरक्षेवर देखरेख ठेवून आहेत. याचबरोबर डेऱ्याबाहेर क्विक रिस्पॉन्स टीमही तैनात करण्यात आली आहे. राम रहीम हा 2017 पासून तुरूंगात होता. पहिल्यांदाच तो फर्लो रजेवर बाहेर आला आहे. याआधी तो आईला भेटण्यासाठी फक्त 12 तासांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता.

Gurmeet Ram Rahim
काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर..! भाजपच्या अनिल बोंडेंची थेट धमकी

राम रहीमचा 69 जागांवर प्रभाव

राम रहीमचे पंजाबमध्ये माझा, माळवा आणि दोआबा या विभागात डेरे आहेत. तेथे त्याला मानणारा वर्ग अधिक आहे. याचबरोबर हरियानातील सिरसा जिल्ह्यात त्याचा प्रमुख डेरा आहे. माळवा विभागात राम रहीमची ताकद अधिक असून, तेथील तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पंजाबमधील 2007, 2012, 2017 मधील विधानसभा निवडणुकीत डेराने महत्वाची भूमिका बजावली होती. माजी मुख्यमंत्री अमरिदरसिंह हे सपत्नीक डेऱ्यात गेले होते. याचबरोबर बादल परिवारानेही डेऱ्यात हजेरी लावली होती. याचसोबत डेराने 2014 ची लोकसभा आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता.

Gurmeet Ram Rahim
भाजपचे 6 उमेदवार डेऱ्यात दाखल झाले अन् 24 तासांतच बाबा राम रहीम तुरुंगातून बाहेर

पंजाब, उत्तर प्रदेशात भाजपला फायदा?

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. राम रहीम 2017 पासून हा तुरुंगात आहे. त्यामुळे तो आता तुरुंगातून बाहेर पडून थेट प्रचारात उडी घेण्याची शक्यता आहे.

पंजाब, उत्तर प्रदेशात भाजपला फायदा

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. राम रहीम हा 2017 पासून तुरुंगात आहे. त्यामुळे तो आता तुरुंगातून बाहेर पडून अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com