New Delhi : बॉलीवूड अभिनेत्री व खासदार कंगना रनौत यांच्या अजब निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांना भेटायचे असेल तर आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार कार्डशिवाय कंगना यांना भेटता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
खासदार मतदारसंघात असल्यानंतर लोकांची त्यांना भेटण्यासाठी रीघ लागते. पण कंगना यांच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील लोकांना त्यांना भेटायला जायचे असेल तर आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. तसेच भेटायला येण्यासाठी एका कागदावर भेटीचे कारण नमूद करावे लागणार आहे.
याविषयी मीडियाशी बोलताना कंगना म्हणाल्या, हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पर्यटक येत असतो. त्यामुळे मंडी भागातील नागरिकांना भेटण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच अडचण कमी व्हावी म्हणून कामाबाबतची माहिती कागदावर लिहावे लागेल. पर्यटक खूप येतात, सामान्य लोकांना त्रास होऊ नये, म्हणून हे केल्याचे कंगना यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे उत्तर हिमाचल प्रदेशातील लोकांना कंगना यांना भेटायचे असेल तर मनालीतील घरी व्यवस्था करण्यात आली आहे. तर मंडीतील लोकांना त्यांच्या या शहरातील कार्यालयात भेटता येईल. तुमच्या कामासाठी थेट भेट घेतल्यास सोपं होईल, असेही कंगना यांनी म्हटले आहे.
कंगना यांच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह म्हणाले, लोकांना मला भेटायचे असल्यास आधार कार्डची गरज नाही. आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला भेटणे आमची जबाबदारी आहे. मग ते काम छोटे असो व मोठे. त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही.
लोकांना ओळखपत्र आणण्यास सांगणे योग्य नाही, असे विक्रमादित्य सिंह म्हणाले. कंगना यांनी विकमादित्य यांचा पराभव केला आहे. ते सध्या हिमाचल प्रदेश सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह व माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे ते पुत्र आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.