Arvind Kejriwal : केजरीवालांना जामीन मंजूर, तरीही ‘तिहार’मध्येच राहावे लागणार; काय आहे कारण?

Supreme Court Delhi Liquor Policy Scam ED AAP : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना मार्च महिन्यात अटक केली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मनी लाँर्डिंगच्या गुन्ह्यात ईडीने केजरीवालांना अटक केली होती. याप्रकरणी कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

केजरीवालांना मनी लाँर्डिंग प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांना तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण केजरीवाल सध्या सीबीआयच्या कस्टडीमध्ये आहेत. सीबीआयने त्यांना भ्रष्टाचारप्रकरणी काही दिवसांपुर्वीच अटक केली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करताना केजरीवाल यांनी 90 दिवस तुरुंगात घालवल्याचे म्हटले आहे. न्यायाधीश संदवी खन्ना आणि दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने जामीन दिला. तसेच ईडीच्या अटकेविरोधात केजरीवालांनी केलेली याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आली.

Arvind Kejriwal
Prashant Kishor News : निवडणूक रणनीतीकारच आता निवडणूक रिंगणात; प्रशांत किशोरांचा नवा पक्ष लढवणार बिहार विधानसभा!

केवळ चौकशीसाठी अटक करणे आवश्यक नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. केजरीवालांनी 90 दिवस तुरुंगवास भोगला आहे. ते निवडून आलेले प्रतिनिधी आहे. ते पदावर असताना पुढे काम करणार की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केजरीवालांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी ते जेलमधूनच राज्याचा कारभार करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता.

Arvind Kejriwal
Nitish Kumar : अखेर नितीश कुमारांनी हवं तेच केलं! मनीष वर्मांवर मोठी जबाबदारी...

सीबीआयच्या प्रकरणात काय होणार?

जामीन मिळाला असला तरी केजरीवालांना जेलमध्येच राहावे लागणार आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात केजरीवालांना दिलासा मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. केजरीवालांकडून याप्रकरणातही कोर्टात दाद मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com