Sanjay Raut: 'कोणावर काय कारवाई करायची हे दिल्लीतून ठरतं'; खासदार राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Sanjay Raut On Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विपश्यनेची गरज, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: "कोणावर काय कारवाई करायची हे सध्या दिल्लीतून ठरतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत कायमचे येऊन राहिले तरी काही फरक पडणार नाही. फडणवीसांना तर विपश्यनेची गरज आहे. कारण फडणवीसांना दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावं लागतंय", अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

"सध्या महाराष्ट्राचा कारभार दिल्लीतून सुरू आहे. महाराष्ट्र हे दिल्लीचे पायपुसणं झालं आहे, असं आम्ही त्यामुळेच म्हणत आहोत. मुंबईचा सौदा सुरू आहे, पण शिवसेना ते होऊ देणारं नाही," असा हल्लाबोल खासदार राऊत यांनी शिंदे-फडणवीसांवर केला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी राज ठाकरेंबाबतही बोलताना सूचक विधान केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Champat Rai : 'मोदी हे भगवान विष्णूचे अवतार'; श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचं वक्तव्य

"राज ठाकरेंना (Raj Thackeray) भाजपला मदत करायची आहे. पण सगळ्यांनी एकत्र येत लोकशाहीची मदत करावी, अशा मताचे आम्ही आहोत. हुकूमशाही विरुद्ध लढण्याची तुमची तयारी किती आहे ? सातत्याने भूमिका बदलणाऱ्यांनी ते सांगितलं पाहिजे. जर त्यांनी ठाम भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो," असे म्हणत खासदार राऊतांनी राज ठाकरेंबाबत सूचक विधान केलं.

शर्मिला ठाकरेंचे मानले आभार...

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत "आदित्य असे काही करेल असं मला वाटत नाही", अशी प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भात बोलताना आता खासदार राऊत यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले आहेत. आदित्य ठाकरे यांच्याबाबत सगळ्यांनी जी भूमिका मांडली, त्याबाबत मी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानतो, असे राऊत म्हणाले.

(Edited by- Ganesh Thombare)

Sanjay Raut
Parliament Winter Session 2023 : अधिवेशनाचा शेवटचा आठवडा गाजणार ? खासदारांचं निलंबन, संसद सुरक्षेच्या मुद्द्यांवर धक सरकारला घेरणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com