Champat Rai : 'मोदी हे भगवान विष्णूचे अवतार'; श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचं वक्तव्य

Champat Rai On PM Modi: चंपत राय यांच्या विधानानंतर राजकारण तापण्याची शक्यता
Champat Rai
Champat Rai Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अवतार असल्याचं चंपत राय म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाचा विरोधक चांगलाच समाचार घेत आहेत. चंपत राय हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी हे विधान केलं.

"पंतप्रधान हे या देशाचे भगवान विष्णूचे अवतार आहेत. भारतीय परंपरेत राजा हा विष्णूचा अवतार आहे. ते देशातील लोकशाहीचे सर्वमान्य व्यक्तिमत्त्व आहेत. ते जगात भारताचे प्रतिनिधित्व करतात", असं विधान चंपत राय यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Champat Rai
PM Modi Varanasi Visit: पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; ताफा थांबवत रुग्णवाहिकेला दिला रस्ता...

तसेच अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारीला मोठा अभिषेक सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 6000 लोकांना बोलावण्यात आले आहे. राम लल्लाच्या या सोहळ्याला पंतप्रधान यजमान म्हणून उपस्थित राहणार नाहीत तर भक्त म्हणून उपस्थित राहणार आहेत, असंही चंपत राय यांनी सांगितलं.

दरम्यान, 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Champat Rai
Arvind Kejriwal : इंडिया आघाडीत फूट? अरविंद केजरीवाल यांच्या 'या' दाव्याने खळबळ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com