Parliament Winter Session 2023 : अधिवेशनाचा शेवटचा आठवडा गाजणार ? खासदारांचं निलंबन, संसद सुरक्षेच्या मुद्द्यांवर धक सरकारला घेरणार

Winter Session 2023: आज लोकसभेत 'टेलिकम्युनिकेशन विधेयक2023' मांडलं जाण्याची शक्यता आहे.
Parliament Winter Session 2023
Parliament Winter Session 2023Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यात संसदेचा सुरक्षा प्रश्न तसेच दोन्ही सभागृहांतून करण्यात आलेलं खासदारांचं निलंबन, यासह आदी विषय गाजण्याची शक्यता आहे. याबरोबरच आज लोकसभेत 'टेलिकम्युनिकेशन विधेयक2023' मांडलं जाण्याची शक्यता आहे.

मागच्या आठवड्यात संसदेत घुसखोरीची घटना घडली होती. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी सभागृहात उडी मारत स्मोक कँडल फोडल्या होत्या. त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणात पाच जणांना अटकही करण्यात आली असून, पुढील तापस सुरू आहे. मात्र, या प्रकारानंतर संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे आता हा मुद्दादेखील गाजण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parliament Winter Session 2023
Parliament Security Breach: "संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर नरेंद्र मोदी पळ काढतायेत"

संसदेत घुसखोरीची घटना घडल्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाले होते. या वेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे सभागृहात काही वेळ गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतून तब्बल 14 खासदारांचे निलंबन केले होते, तर राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे आता खासदारांचं निलंबन हा विषयदेखील गाजण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सरकारला घेरण्याची जोरदार तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. सभागृह सुरू होण्यापूर्वी 'इंडिया आघाडी'च्या नेत्यांची काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या दालनात बैठक पार पडली आहे. त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा विविध प्रश्नांनी गाजण्याची शक्यता आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Parliament Winter Session 2023
PM Modi Varanasi Visit: पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; ताफा थांबवत रुग्णवाहिकेला दिला रस्ता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com