Anil Bonde,  Sanjay raut
Anil Bonde, Sanjay rautSarkarnama

Anil Bonde On Sanjay Raut: 'मोदी है तो मुमकीन है...' हे राऊत विसरले आहेत का ? अनिल बोडेंचा राऊतांना चिमटा

BJP News : दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु
Published on

Mumbai Political News: ''इंडिया को हराना मुश्कील ही नहीं नामुमकीन है' असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी राऊतांना चोख उत्तर दिले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे.

"इंडिया आघाडीचा फक्त नरेंद्र मोदी हेच पराभव करु शकणार, देशात संपूर्ण जनता मोदींच्या पाठिशी आहे. संजय राऊत विसरले असतील की मोदी है तो मुमकीन है," असा टोला बोडेंनी राऊतांना लगावला.

मोदींना हरविण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. काल इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा आणि एनडीएला इंडियाची भीती वाटते आहे. आम्हाला मिळणारा लोकांचा पाठिंबा वाढतो आहे, त्यामुळे भाजपाच्या पोटात गोळा आला आहे, असे राऊत म्हणाले.

Anil Bonde,  Sanjay raut
Mantralaya News: मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा निघाला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी ; मुख्यमंत्र्यांशी आताच बोलणे करून द्या...

"आमच्या इंडियाच्या बैठका वाढल्या की देशातली महागाई कमी होणार आहे. कारण हे सरकार इंडियाला घाबरलं आहे," असं संजय राऊत यांनी काल म्हटलं आहे. "चंद्रावरील भारत जाऊ शकतो, मोदी है तो मुमकीन है," हे राऊत विसरले आहेत का ? असा सवाल अनिल बोडे यांनी उपस्थित केला आहे.

Anil Bonde,  Sanjay raut
Ashish Shelar News : महाराष्ट्रद्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, तर किमान..; शेलारांनी ठाकरेंची खिल्ली उडवली..

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

२०२४ मध्ये इंडिया को हराना मुश्कीलही नहीं नामुमकीन है, असा डायलॉग काल राऊतांनी मारला होता. "आम्ही सगळे पक्ष एकमेकांसह अशा नात्यात बांधलो गेलो आहोत जे नातं देशभक्तीचं आहे. आमच्यात कुठलेही मतभेद आणि मनभेद नाहीत. पूर्ण तयारीनिशी आम्ही बैठक घेत आहोत," असेही राऊतांनी स्पष्ट केलं. इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपा आणि एनडीएमध्ये भीतीचं वातावरण असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com