Prashant Dikker News : शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा टोकाचं पाऊल उचलणार ; बेपत्ता प्रशांत डिक्करांचा व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Government : अज्ञान स्थळावरुन प्रशांत डिक्कर यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
Prashant Dikker News
Prashant Dikker News Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Jamod : शेतकऱ्यांचे प्रश्नांवर आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर हे कालपासून (गुरुवार) बेपत्ता आहेत. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 'शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आत्मदहन करणार," असा गंभीर इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. (Latest Marathi News)

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या, या मागणीसाठी अन्न त्याग आंदोलनाला बसलेले प्रशांत डिक्कर गेल्या २४ तासापासून उपोषण मंडपातून बेपत्ता आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.डिक्कर यांना शोधून आणण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी प्रशासन आणि पोलिसांना केली आहे.

Prashant Dikker News
Swabhimani Shetkari Sanghatana News : 'स्वाभिमानी'चे प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता ; प्रशासनाची धावपळ

प्रशांत डिक्करांना शोधून आणण्याच्या मागणीसाठी आज (शुक्रवारी) मोठ्या प्रमाणात शेतकरी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जळगाव जामोद येथे साखळी उपोषणाचे आयोजन केले आहे.

आज सकाळी प्रशांत डिक्कर यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. "सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची तात्काळ मदत करावी, अन्यथा आगामी काळात अज्ञात ठिकाणी आत्मदहन करणार," असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Prashant Dikker News
Anil Bonde On Sanjay Raut: 'मोदी है तो मुमकीन है...' हे राऊत विसरले आहेत का ? अनिल बोडेंचा राऊतांना चिमटा

गेल्या सहा दिवसापासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी संघटनेकडून उपोषण सुरु आहे. तीन दिवसापूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपाचा वीज पुरवठा खंडीत केला होता. त्या विरोधात महाविकास आघाडीने जळगाव जामोद येथे रस्ता रोको केला होता.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com