Tahawwur Rana India : मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार व मूळचा पाकिस्तानी असणारा दहशतवादी आणि सध्याचा कॅनडीयन नागरिक असलेला तहव्वुर हुसैन राणा भारतात त्याच्या प्रत्यार्पणास होण्यास प्रचंड घाबरतोय.
त्याने अमेरिकन न्यायालयात एक याचिका सादर करून सांगितले, की तो विविध कारणांमुळे भारतात टिकू शकणार नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण तत्काळ रोखले जावे. कारण, जर यावर स्थगिती आणली गेली नाही तर भारतात त्याच्या याचिकेवर कोणताही पुनर्विचार केला जाणार नाही. अमेरिकाही आपले अधिकार क्षेत्र गमावेन.
2008मध्ये मुंबई हल्ला घडवून आणण्यासाठी षडयंत्र रचणाऱ्या राणाने म्हटले की, जर त्याचे भारतात प्रत्यार्पण झाले तर, या गोष्टीची दाट शक्यता आहे की पाकिस्तानी मुस्लिम असल्याने त्याचा छळ होईल. शिवाय, तो मुस्लिम धर्मीय आहे आणि मूळ पाकिस्तानी आहे आणि पाकिस्तानी सैन्याचा सदस्यही होता. एवढंच नाहीतर त्यांनी आपल्या याचिकेतून हेही सांगितले की, तो भारतात गेल्यास त्याला एखाद्या तत्काळ आदेशानुसार मारले देखील जाईल
26/11 च्या कटात सहभागी असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईतील लक्षांवर रेकी करण्यास मदत केल्याचा आणि लष्कर-ए-तय्यबा ला लॉजिस्टिकल सपोर्ट केल्याचा आरोप राणावर आहे. अमेरिकेबाहेर मुंबई आणि कोपनहेगन येथे दहशतवादी कटात सहभागाप्रकरणी 2009 मध्ये FBI ने राणाला अटक केली आहे.
भारताने राणाचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना अडथळा निर्माण करण्यासाठी तहव्वूर राणाने न्यायालयात दाद मागितली होती. दोन्ही देशातील प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारतात पाठवल जाऊ शकते, सुनावणी होईपर्यंत आपल्याला हिंदुस्थानाच्या ताब्यात देऊ नका, अशी विनंती त्याने याचिकेत कोर्टाकडे केली होती. त्याची याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.