MLC Election : तेलंगणातील निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का; पंतप्रधान मोदींनीही थोपटली पाठ...

Telangana Election BJP Congress News PM Narendra Modi : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएला यश मिळाले आहे.  
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपने दक्षिणेतही काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला दोन जागांवर मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेसच्या पदरात केवळ एकच जागा पडली आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. त्यामुळे भाजपसाठी या विजयाचे महत्व किती आहे, हे अधोरेखित झाले आहे. तेलंगणासह आंध्र प्रदेशातही एनडीएला यश मिळाले आहे. या राज्यात तीन जागांपैकी एनडीएला दोन तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. आंध्रात वायएसआर काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणुकीपासून लांब राहिले.

Narendra Modi
S Jaishankar News : मोठी बातमी : खलिस्तान्यांकडून एस जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, तिरंगा फाडला...  

तेलंगणामध्ये बीआरएसने निवडणूक लढवली आहे. या राज्यात करीमनगर-निझामाबाद-मेडक-अदिलाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपचे सी अन्जी रेड्डी आणि शिक्षक मतदारसंघातून भाजपच्या मुल्का कोमैरह यांना मोठा विजय मिळाला. काँग्रेसचा पाठिंबा असलेले पिंगिली श्रीपाल रेड्डी हे वारंगल शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले.

आंध्र प्रदेशातही एनडीएचा पाठिंबा असलेले दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. दोन्ही राज्यांतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आहेत. प्रामुख्याने तेलंगणातील विजय भाजपसाठी महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या पोस्टलाही महत्व आले आहे.

Narendra Modi
Prashant Kishor on Nitish Kumar : 'नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक तर लढवतील, मात्र नंतर...' ; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा!

पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, एमएलसी निवडणुकीत भाजपला सहकार्य केल्याबद्दल तेलंगणातील नागरिकांचे मी आभार मानतो. तसेच निवडून आलेल्या उमेदवारांनाही शुभेच्छा देतो. लोकांमध्ये समर्पित भावनेतून काम करत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे, असे मोदींनी म्हटले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com