Rajiv Gandhi News : अय्यर यांनी काढली राजीव गांधींची शैक्षणिक पात्रता; ‘तो’ किस्सा सांगत काँग्रेसला डिवचले…

Mani Shankar Aiyar Congress Prime Minister : मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीमध्ये राजीव गांधी यांच्या शिक्षणावर भाष्य केले आहे.
Rajiv Gandhi, Mani Shankar Aiyar
Rajiv Gandhi, Mani Shankar AiyarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शैक्षणिक योग्यतेवरच बोट ठेवले आहे. राजीव गांधी दोनदा नापास झाले होते, तरीही त्यांना पंतप्रधान बनवण्यात आले, असे अय्यर म्हणाले आहेत.

अय्यर यांनी एका मुलाखतीमध्ये राजीव यांच्या शिक्षणावर भाष्य केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून भाजपकडून त्यावरून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे सोशल मीडियाचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर काँग्रेस नेत्यांनी अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rajiv Gandhi, Mani Shankar Aiyar
MLC Election : तेलंगणातील निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का; पंतप्रधान मोदींनीही थोपटली पाठ...

काय म्हणाले अय्यर?

राजीव गांधींवर बोलताना अय्यर म्हणाले आहेत की, राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान बनले, तेव्हा मी विचार केला की, एक व्यक्ती जी पायलट होती आणि दोनदा नापास झाली. ती व्यक्ती पंतप्रधान कशी बनू शकते? मी त्यांच्यासोबत केंब्रिजमध्ये शिकलो. तिथे ते नापास झाले.  त्यानंतर ते लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्ये गेले. तिथेही नापास झाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

केंब्रिजमध्ये नापास होणे खूपच अवघड असते. कारण तिथे विद्यापीठ आपली प्रतिमा खराब होऊ देत नाही. तरीही ते पास होऊ शकले नाहीत. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, असे शिक्षणाचे रेकॉर्ड असलेला व्यक्ती पंतप्रधान कसा होऊ शकते, असे विधान करत मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे.

Rajiv Gandhi, Mani Shankar Aiyar
S Jaishankar News : मोठी बातमी : खलिस्तान्यांकडून एस जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, तिरंगा फाडला...  

अय्यर यांच्या विधानावरून काँग्रेसने टीका केली आहे. माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल म्हणाले, मी त्यांचे विधान पाहिले नाही. त्यांनी असे म्हटले असेल तर ते चुकीचे आहे. राजीव गांधी देशाचे महान नेते होते. खूप कमी कालावधीत त्यांनी नाव कमावले. परदेशात त्यांचा आदर केला जायचा. कधीकाळी अय्यर हे राजीव यांचे निकटवर्ती असल्याबाबत गर्व करत होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अयर यांच्यावर टीका केली. काँग्रेसचा एखादा नेता असे बोलू शकतो, हे समजण्यापलीकडे आहे. राजीव गांधी कोणत्या क्लासमध्ये पास झाले की नाही, याचा काही संबंध नाही. हताश झाल्याने त्यांनी हे विधान केले आहे. राजीव गांधी यांच्या काळात जे महत्वाचे कायदे पारित झाले, ते नेहमीच देशाच्या आठवणीत राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com