Narendra Modi : सरस्वती बुध्दी वाटत असताना ते सर्वात पुढे होते! पंतप्रधान मोदी कुणाला म्हणाले विद्वान?

Global Fintech Fest Rahul Gandhi : मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना बालकबुध्दी असा उल्लेख केला होता. शुक्रवारी त्यांनी मुंबईत कोणत्याही नेत्याचे नाव न घेता खिल्ली उडवली आहे.

मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. देशात झालेल्या फिनटेक क्रांतीवर बोलताना ते म्हणाले, मागील दहा वर्षांत फिनटेकमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. फिनटेक स्टार्टअप मध्ये 500 टक्के वाढ झाली आहे.

Narendra Modi
Rahul Gandhi : काँग्रेसचा राहुल गांधी नव्हे तर ‘या’ नेत्यावर सर्वाधिक खर्च; तरीही निवडणुकीत झाला पराभव

आधी स्वत:ला विद्वान समजणारे लोक संसदेत उभे राहून प्रश्न विचारायचे. सरस्वती जेव्हा बुध्दी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यात पहिले उभे होते. हे लोक म्हणायचे, भारतात बँकांच्या शाखा नाहीत, गावांगावात बँका नाहीत. इंटरनेट नाही, वीज नाही. फिनटेक क्रांती कशी होणार, असे विचारायचे. माझ्यासारख्या चहावाल्याला विचारत होते, असा टोला मोदींनी लगावला. त्यामुळे त्यांचा रोख कुणाकडे होता, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

आज एका दशकातच भारतात ब्रॉडबँड यूझर सहा कोटीवरून 94 कोटी झाले आहेत. 53 कोटींहून अधिक लोकांकडे जनधन बँक खाते आहे. दहा वर्षांत आम्ही एकप्रकारे यूरोपियन युनियनच्या लोकसंख्येएवढ्या लोकांना बँकांशी जोडले आहे. आज जगातील जवळपास अर्धा रिअल टाईम डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. पूर्ण जगात भारताचा यूपीआय फिनटेकचे मोठे उदाहरण बनले आहे, अशी माहिती मोदींनी दिली.

Narendra Modi
Congress Politics : खासदारांना लढवायचीय विधानसभेची निवडणूक; काँग्रेससाठी...इकडं आड तिकडं विहीर!

आज प्रत्येक गाव, शहरात बँकिंग सेवा चोवीस तास सुरू असते. जनधन योजनेची दहा वर्षे पूर्ण झाले. ही योजना महिला सक्षमीकरणाचे मोठे माध्यम बनले आहे. 29 कोटी महिलांची खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये महिलांसाठी बचत आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण झाल्या. मुद्रा योजनाही यामाध्यमातून आणण्यात आली. आतापर्यंत 27 ट्रिलियन रुपयांचे क्रेडिट देण्यात आले आहे. या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला आहेत, असे मोदींनी सांगितले.

फिनटेक क्रांती सर्वत्र दिसत आहे, असल्याचे सांगून मोदी म्हणाले, सरकारच्या शेकडो योजनांमध्ये डीबीटी सेवा सुरू आहे. भारतात फिनटेकमुळे जो बदल घडला, तो केवळ तंत्रज्ञानापर्यंतच मर्यादित नाही तर सामाजिक परिणामही व्यापक आहे. गाव आणि शहरांतील दरी कमी करण्यात मदत मिळाली आहे. कधीकाळी बँक एका इमारतीतच असायच्या. आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आल्या आहेत, असे मोदींनी नमूद केले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com