Rahul Gandhi : काँग्रेसचा राहुल गांधी नव्हे तर ‘या’ नेत्यावर सर्वाधिक खर्च; तरीही निवडणुकीत झाला पराभव

Congress Vikramaditya Singh Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली कामगिरी उंचावत 99 जागांवर विजय मिळवला आहे.
Rahul Gandhi, Congress
Rahul Gandhi, CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारलेल्या काँग्रेसने कोणत्या उमेदवारासाठी किती पैसे खर्च केले याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधींनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यासाठी पक्षाने 1 कोटी 40 लाख म्हणजे प्रत्येक मतदारसंघात 70 लाख रुपये खर्च केले. पण पक्षाने एका उमेदवारावर राहुल यांच्यापेक्षा जास्त खर्च केला आहे.

राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वानयाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत दणदणीत विजयही मिळवला आहे. प्रामुख्याने रायबरेलीमध्ये त्यांचा कस लागणार होता. त्यामुळे पक्षाची मोठी टीम या मतदारसंघात कार्यरत होती. परंतू, दोन्ही मतदारसंघात मिळून 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचे काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Rahul Gandhi, Congress
Congress Politics : खासदारांना लढवायचीय विधानसभेची निवडणूक; काँग्रेससाठी...इकडं आड तिकडं विहीर!

पार्टी फंडाडून विक्रमादित्य सिंह यांना सर्वाधिक 87 लाख रुपये देण्यात आले होते. त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण कंगना रनौत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, पक्षाकडून 70 लाख रुपये मिळालेल्या अन्य नेत्यांमध्ये किशोरी लाल शर्मा यांचाही समावेश आहे. त्यांनी अमेठीत भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव केला.

काँग्रेसने के. सी. वेणुगोपाल आणि मणिकम टागोर, राधाकृष्ण आणि विजय इंतर सिंगला यांनाही प्रत्येकी 70 लाख रुपये दिले होते. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि दिग्विजय सिंह यांना अनुक्रमे 46 लाख आणि 50 लाख दिल्याची माहिती पक्षाने दिली आहे. मात्र, दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला.

Rahul Gandhi, Congress
Jagan Mohan Reddy : जगनमोहन रेड्डींना जोरदार झटका; चंद्राबाबू राज्यसभेत फोडणार भोपळा

किती आहे खर्चाची मर्यादा?

लोकसभा निवडणुकीतील प्रचारात खर्च करण्यासाठी उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा निश्चित केली जाते. सध्या लोकसभेसाठी ही मर्यादा 95 लाख आणि विधानसभेसाठी 40 लाख रुपये एवढी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com