वडिलांना मारताना मुलगी बिलगली, तरीही धिंड काढत द्यायला लावल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा 

आमच्याहिंदू कुटूंबाला जर त्रास होत असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू, असा इशारा बजरंग दलाच्यादिलीप सिंह यांनी दिला होता.
UP Muslim man forced to chant jai ShriRam slogans
UP Muslim man forced to chant jai ShriRam slogans
Published on: 
Updated on: 

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम तरूणाला मारहाण करत त्याची धिंड काढली. तसेच त्याला 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला लावल्याची घटना समोर आली आहे. यावेळी या तरूणाची मुलगी वडिलांना वाचवण्यासाठी बिलगली होती. ती रडतच वडिलांना न मारण्याची विनंती करत राहिली. पण त्यानंतरही तरूणाची धिंड थांबली नाही. (UP Muslim man forced to chant jai ShriRam slogans)

कानपुरातील एका वस्तीमध्ये कुरैशा आणि राणी यांचे कुटूंब एकमेकांच्या शेजारी राहते. या दोन कुटूंबांमध्ये दुचाकीवरून वाद झाला होता. यातून कुरैशा यांनी राणी यांच्यावर मारहाणीचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली. तर राणी यांनी कुरैशा यांच्या मुलांवर छेडछाडीचा आरोप केला. या प्रकरणात नंतर बजरंग दलाने उडी घेत बुधवारी कुरैशाच्या घरावर हल्ला केला. ते कुरैशा यांच्या मुलांना पकडण्यासाठी गेले होते. 

पण मुलं न सापडल्याने त्यांनी कुरैशा यांच्या अफसार या दिराला पकडत मारहाण सुरू केली. त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. यावेळी त्यांची मुलगी त्यांच्याजवळच होती. वडिलांना मारहाण होत असताना ती त्यांच्या पायाला बिलगून होती. मारहाण न करण्याची विनंती ती करत होती. पण त्यानंतरही मारहाण थांबली नाही. दरम्यान, या प्रकारपूर्वी बजरंग दलाने तिथे एक सभाही घेतली होती. 

सभेमध्ये कानपूर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दिलीप सिंह म्हणाले, की आम्ही हिंदू समाजाचे नुकसान होऊ देणार नाही. आमच्या सनातन धर्माला वाचवण्यासाठी आम्ही स्वत: सक्षम आहोत. आमच्या हिंदू कुटूंबाला जर त्रास होत असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू, असा इशाराही दिलीप सिंह यांनी दिला होता. 

दरम्यान, पोलिसांनी कुरैशी आणि राणी या दोन्ही कुटूंबाची तक्रार घेत चौकशी सुरू केली होती. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून राणी यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी वस्तीमध्येच सभा घेतली. कुरैशा यांच्या म्हणण्यानुसार, 'राणी यांच्या दरवाजाला दुचाकी लागल्यावरून हा वाद सुरू झाला. पण नंतर त्याला धार्मिक रंग देण्यात आला.' 

अफसार यांची धिंड काढत असताना पोलिस त्याठिकाणी आले व त्यांची सुटका केली. त्यांनी काही जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपूर दक्षिणचे सहाय्यक पोलिस आयुक्त रवीना त्यागी म्हणाल्या, पीडिताच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये काही अज्ञात व्यक्तीही आहेत. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.