Nara Lokesh on Muslim Reservation : चंद्राबाबूंच्या लेकानं भाजपला ठणकावलं; आरक्षण वाढवणार टेन्शन

Andhra Pradesh Muslim Reservation Nara Lokesh Chandrababu Naidu : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता.
Nara Lokesh Chandrababu Naidu
Nara Lokesh Chandrababu NaiduSarkarnama

Andhra Pradesh News : कर्नाटकमध्ये काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसीतून रातोरात आरक्षण दिलं... ओबीसींच्या आऱक्षण कमी केले... ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील विधानं. मोदींनी प्रचारादरम्यान मुस्लिम आरक्षणाला थेट विरोध केला होता. पण मोदींना आपली तलवार आता म्यान करावी लागणार आहे.

आंध्र प्रदेशात ‘एनडीए’ची सत्ता आली आहे. राज्यात मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण पुढेही कायम राहील, असे आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी केले आहे. हे लांगूनचालन नसून सामाजिक न्याय असल्याचे सांगत त्यांनी आरक्षणावरून एकप्रकारे भाजपला अप्रत्यक्षपणे ठणकावलं आहे.

नारा लोकेश यांनी एका मुलाखतीमध्ये तेलगू देसम पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. रोजगार निर्मिती आणि मागास लोकांचे जीवनमान उंचावणे याला आमच्या पक्षाचे प्राधान्य असेल. मागील दोन दशकांपासून मुस्लिमांना आरक्षण आहे. आमचाही त्याला पाठिंबा असून पुढेही सुरूच ठेऊ, असे नारा लोकेश यांनी स्पष्ट केले.

आरक्षण हे लांगूनचालन करण्यासाठी नव्हे तर अल्पसंख्यांकांना सामाजिक न्याय देण्यासाठी आहे. राज्यात त्यांचे उत्पन्न सर्वात कमी आहे. सरकार म्हणून त्यांना गरिबीतून बाहेर काढणे, माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेऊ ते त्यांच्या विकासासाठी असेल, असे नारा लोकेश म्हणाले.

Nara Lokesh Chandrababu Naidu
PM Narendra Modi : मोदींना एवढी कसली भीती? मंत्रिपदाबाबत खासदारांना केलं अलर्ट

देशाला विकसित बनवायचे असेल तर कुणालाही मागे ठेऊन चालणार नाही. सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची ही चांगली संधी आहे. सर्वांना सोबत घेणे, हा टीडीपीचा ट्रेडमार्क असल्याची भूमिका नारा लोकेश यांनी मांडली. टीडीपीला राज्यात लोकसभेच्या 16 जागांवर विजय मिळाला असून राज्यातही पुन्हा सत्ता मिळाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच केंद्रातही पक्षाचा दबदबा राहणार आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com