Women Reservation Bill: पंतप्रधान मोदींचा धडाका; नव्या संसदेच्या पहिल्याच दिवशी महिला विधेयकाची घोषणा

Narendra Modi In New Parliament: महिला आरक्षणाबाबत १९९६ पासून फक्त चर्चा झडल्या
New Parliament, Narendra Modi
New Parliament, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : नव्या संसदेत मंगळवारी विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. या संसदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक घोषणा करून कामाचा धडाका सुरू केला आहे. मोदींनी या वेळी अनेक वर्षे रखडलेल्या महिला विधेयक संसद पटलावर मांडण्याची घोषणा केली. तसेच या ऐतिहासिक निर्णयाला सर्व सदस्यांनी पाठिंबा देऊन महिला आरक्षण कायदा करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहनही मोदींनी केले. (Latest Political News )

अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची संधी मिळाल्याचे सांगून मोदी म्हणाले, 'महिला आरक्षणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत आहेत. त्यावर अनेक वाद-विवाद झाले आहेत. १९९६ मध्ये प्रथमच महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. ते लागू करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेकदा प्रयत्न झाले. मात्र संख्याबळाअभावी हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे आपले स्वप्न अपूर्ण राहिले. आता महिलाच्या शक्तीचा देशाच्या हितासाठी उपयोग करून घेण्याची संधीही मला मिळाली आहे. त्यामुळे आजची १९ सप्टेंबर २०२३ ही तारीख इतिहासात सुवर्ण आक्षरात लिहिली जाईल.' (Maharashtra Political News)

New Parliament, Narendra Modi
Yavatmal Bank Election : अध्यक्षाच्या नावावर एकमत न झाल्याने सुंदोपसुंदी, आता निवडणूक २५ सप्टेंबरला !

सध्या सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. आता त्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला महिला आरक्षणामुळे मोठे बळ मिळणार असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. नव्या संसदेतील प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या महिला आरक्षणामुळे देशात नव्या बदलांची नांदी सुरू झाल्याचेही मोदींनी सांगितले. या ऐतिहासिक दिवशी या विधेयकाला सर्व सदस्यांनी पाठिंबा द्यावा. हा कायदा बनला तर लोकशाहीची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केला.

मोदी म्हणाले, 'वुमेन लेड डिव्हलपमेंटअंतर्गत सरकार आज प्रमुख संविधान संशोधन विधेयक प्रस्तुत करत आहे. या विधेयकाचे लक्ष लोकसभा आणि विधानसभेत महिलांची टक्केवारी वाढवण्यासाठी होणार आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' माध्यमातून देशाची लोकशाही मजबूत होणार आहे. या विधेयकासाठी देशातील महिलांना, भगिनींना मुलींना शुभेच्छा! या विधेयकाचा कायदा करण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत,' असा शब्दही मोदींना देशातील महिलांना दिला.

(Edited by Sunil Dhumal)

New Parliament, Narendra Modi
Rahul Narwekar At Lalbaug Raja: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर लालबागच्या गणपती दर्शनाला; राजाला काय घातलं साकडं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com