PM Narendra Modi : भाजपचा फर्जीवाडा, मोदींसाठी तयार केली ‘नकली यमुना’! Video दाखवत धक्कादायक दावा...

AAP Leader Alleges Fake Yamuna Created for PM Modi : भाजपने दिल्लीत छठ पूजेच्या आस्थेचीही खिल्ली उडविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
Political Controversy Over Narendra Modi’s Chhath Ritual
Political Controversy Over Narendra Modi’s Chhath RitualSarkarnama
Published on
Updated on

Delhi BJP Government Faces Accusations Ahead of Chhath Puja : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यमुना नदीत वासुदेव घाट येथे छठ स्नान करणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान मोदींच्या स्नानासाठी भाजप सरकारने दिल्लीतील वासुदेव घाट येथे नकली यमुना नदी तयार केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेश प्रमुख सौरभ भारद्वाज यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकार गंभीर आरोप करत नदीच्या स्वच्छतेवरूनही निशाणा साधला आहे. छठ पूजा 25 ते 28 ऑक्टोबरदरम्यान साजरी केली जाते. बिहार निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच हा उत्सव साजरा होत आहे.

सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियात व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींसाठी नकली यमुना नदी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये वजीराबाद प्रकल्पातून शुध्द पिण्याचे पाणी ओतण्यात आले आहे. वासुदेव घाटाला लागून खऱ्या यमुना नदीजवळच ही नदी तयार करण्यात आली आहे. या नकली नदीत पंतप्रधान मोदी डुबकी घेणार आहेत.

Political Controversy Over Narendra Modi’s Chhath Ritual
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राहुल गांधी आक्रमक; पत्रातील ‘त्या’ उल्लेखावरून दिले मोठे संकेत

यमुना नदी स्वच्छ झाली असे पूर्वांचलमधील लोकांना वाटावे, यासाठी नकली यमुना नदी खऱ्या यमुना नदीलगत तयार करण्यात आली आहे. बिहारमध्ये यमुना आणि छठच्या नावावर मते मिळविण्यासाठी भाजप हा फर्जीवाडा करत आहे. दिल्लीतील भाजप सरकारचा हा फर्जीवाडा केवळ दिल्लीकरांसोबत नाही, बिहारसोबत नाही तर छठ मैय्यासोबतही केला जात असल्याची टीका भारद्वाज यांनी केली आहे.

आप नेत्याने सोशल मीडियात पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, तिथे मीडियाला एंट्री दिली जाणार नाही. केवळ सरकारी कॅमेरे असतील. युमनेचे पाणी स्नान करण्यायोग्यही नाही. एखाद्या लहान मुलाने डुबकी घेतली तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. नदीच्या पाण्यात जास्तवेळ उभे राहिल्यास आजार होऊ शकतात. यमुना दुषित आहे, हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनाही माहिती आहे, असे ‘आप’ने म्हटले आहे.

Political Controversy Over Narendra Modi’s Chhath Ritual
Top 10 News : मोदी-शहांचा शिंदेंना आदेश, दिल्लीत काय घडलं?, मुरलीधर मोहोळांपुढे एकमेव पर्याय, निवडणूक आयोगाचा भाईचारा; वाचा महत्वाच्या घडामोडी

भाजपने दिल्लीत छठ पूजेच्या आस्थेचीही खिल्ली उडविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजपने यावरून पलटवार केला आहे. भाजपचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे की, आम आदमी पक्ष 10 वर्षांत 6500 कोटी खर्च करून यमुना स्वच्छ करू शकले नाहीत. आम्ही घाटांवर स्वच्छता अभियान राबवले. केजरीवाल आणि भारद्वाज यांना हे सहन होत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com