Kolhapur Politics : दिग्गज नेते असूनही पक्ष संघटनेत स्थान नाही; स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना!

Congress Leader News : जिल्ह्यातील नेते झटत असले, तरीही पक्षाकडून या विभागात प्रतिनिधित्व देण्यात दुर्लक्ष केले जात आहे.
Congress Kolhapur news
Congress Kolhapur newsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्ययांकडे काँग्रेसच्या नेतृत्वाने गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कॉग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये छुपी नाराजी आहे. यामुळे या भागात काँग्रेस संघटनाच्या पातळीवर पूर्वीप्रमाणे दिसून येत नाही. संघटनेची ताकद वाढली पाहिजे, अशी भावना स्थानिक नेते-कार्यकर्त्यांमध्ये आहे. (Latest Marathi News)

Congress Kolhapur news
Someshwar Sugar Factory: अमित शाह यांच्यासमोर सांगितलेला शब्द अजितदादांनी खरा केला ; 'सोमेश्वर'कडून 3350 रुपये दर जाहीर

सातारा, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तरीही सांगलीत दिवंगत पतंगराव कदम, साताऱ्यात दिवंगत विलासकाका पाटील - उंडाळकर, कोल्हापूरमध्ये पी. एन. पाटील यांनी काँग्रेस या भागात टिकवली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसला चांगले दिवस आले, मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ संपल्यानंतर पुन्हा काँग्रेसची वाताहत झाली होती. आता कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांनी सर्वांची मोट बांधत चार आमदार निवडून आणले.

Congress Kolhapur news
Dhule NCP Office News: पक्ष कार्यालयावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान राडा; अखेर दोन टाळे लागले!

सांगलीत पतंगराव कदम यांच्या निधनानंतर आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीत पक्ष वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेत. साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. हे तीनही जिल्ह्यातील नेते झटत असले, तरीही पक्षाकडून या विभागात प्रतिनिधित्व देण्यात दुर्लक्ष केले जात आहे.

Congress Kolhapur news
Hari Narke Passed Away : ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांचे निधन; पुरोगामी चळवळीचा चेहरा हरपला!

आतापर्यंत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, विजय वडोट्टीवार अशा नेत्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली. या तीन जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यापैकी एकाला प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिल्यास काँग्रेस वाढीला संधी आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने काही जागांवर काँग्रेसला दावा सांगता येणार आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने याचा विचार करून आता दक्षिण महाराष्ट्राला संधी देण्याची गरज आहे, अशी कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com