Ashok Chavan On Rahul Gandhi: राहुल गांधी बुलंद आवाजाने लोकसभा पुन्हा दणाणून सोडतील..

Congress Political News: देशभरातील लोकशाहीवादी नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
Ashok Chavan On Rahul Gandhi News
Ashok Chavan On Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News: राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी त्यांना पुन्हा बहाल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांची खासदारकी पुन्हा देण्याचा निर्णय नुकताच दिला. या निर्णयानंतर काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा देशभरात जल्लोष सुरू होता. कर्नाटक राज्यातील विजयानंतर काॅंग्रेससाठी हा दुसरा आनंदाचा आणि सुखद धक्का देणारा क्षण असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Ashok Chavan On Rahul Gandhi News
Ambadas Danve On Bawankule: उद्धव ठाकरे आजही बलशाली, दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना सुनावले..

राहुल गांधी पुन्हा लोकसभेत आपला आवाज बुलंद करतील, असा विश्वास काॅंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण देशाला मागील दोन दिवस ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती, अखेर तो निर्णय झाला आहे. काँग्रेस नेते (Rahul Gandhi) राहुलजी गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे.

हा लोकशाहीचा आणि न्यायाचा विजय आहे. (Congress) केवळ काँग्रेसचे कार्यकर्तेच नव्हे तर देशभरातील लोकशाहीवादी नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. राहुलजी गांधी रस्त्यावर उतरून देशाचे प्रश्न मांडतच होते.

आता तेच प्रश्न संसदेत मांडण्याचा त्यांचा अधिकार पुनर्स्थापित झाला असून, या निमित्ताने ते पुन्हा एकदा आपल्या बुलंद आवाजाने लोकसभा दणाणून सोडतील, याचा संपूर्ण देशाला विश्वास, असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. गुजरात न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा केली होती. त्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com