Vande Mataram : 'वंदे मातरम' बाबत नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, ज्यामुळे वाद त्याचीच अंमलबजावणी; 'ती' सहाही कडवी अनिवार्य !

Narendra Modi Vande Mataram : यापूर्वी वंदे मातरम गीताची फक्त पहिली दोन कडवी गायली जात होती. मात्र, आता संपूर्ण सहाही कडवी असलेले वंदे मातरम गाणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Narendra modi
Narendra modi Sarkarnama
Published on
Updated on

National Song : वंदे मातरम् या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या गीतातील संपूर्ण सहा कडवी गाणे अनिवार्य केले आहे. सरकारी कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले होते. या पूर्वी वंदे मातरम गीताची दोनच कडवी गात जात होती.

स्वातंत्र्यपूर्वी काळात गीताच्या दोन कडव्यानंतरच्या कडव्याबाबत वाद झाला होता. त्यामुळे केवळ दोनच कडवी गाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंकीम चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतील हे गीत स्वातंत्र्यपूर्वी काळात क्रांतीकाराकांसाठी तसेच स्वातंत्र्य चळवळीसाठी स्फुर्ती गीत ठरले होते.

बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या या अजरामर गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने आठ डिसेंबर 2025 संसदेत चर्चा झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसकडून म्हटले होते की, 1937 मध्ये वंदे मातरममधील काही महत्त्वाचा भाग काढून टाकण्यात आला. हा अन्याय का करण्यात आला? यातून विभाजनाची बीजे पेरली गेली.

काँग्रेस नेते यांनी संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर त्यांना उत्तर देताना म्हटले होते की, आम्ही संविधान सभेत मुस्लिम लीगला स्पष्ट सांगितलं की त्यांच्या मागण्या मान्य होणार आहे. वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊ. जण गण मन हे आपले राष्ट्रीय गीत असेल तर वंदे मातरम हे आपलं राष्ट्रगान असेल.

केंद्र सरकारकडून संपूर्ण सहाही कडव्यांचे गाणं बंधनकारक करून देशभक्तीच्या भावनेला अधिक बळ दिली आणि गीताचा सन्मान राखला, असे मत भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी शिष्टाचारात मोठा बदल होणार असून सर्व नागरिकांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे.

Narendra modi
Nirmala Gavit Politics: एकनाथ शिंदेंच्या नेत्याला मोठा दिलासा, माजी आमदार गावित यांच्या विरोधकांना न्यायालयाची चपराक!

संपूर्ण वंदे मातरम गीत

वंदे मातरम्, वंदे मातरम्!

सुजलाम, सुफलाम, मलयज शीतलाम्!

शस्यश्यामलाम्, मातरम्!

वंदे मातरम्!

शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,

फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्

सुखदाम् वरदाम् मातरम्!

वंदे मातरम्, वंदे मातरम्।।

कोटि कोटि कण्ठ कल कल निनाद कराले

द्विसप्त कोटि भुजैर्धुत खरकरवाले

के बोले मा तुमी अबले

बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्

रिपुदलवारिणीम् मातरम्।।

वंदे मातरम्!

तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्म

त्वं हि प्राणा:शरीरे

बाहुते तुमि मा शक्ति,

हृदय तुमि मा भक्ति,

तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम्।।

वंदे मातरम्

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदल विहारिणी

वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्

नमामि कमलां अमलां अतुलाम्

सुजलां सुफला मातरम्

वंदे मातरम्

श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्

धरणीं भरणीं मातरम्।।

Narendra modi
Nashik NMC Politics: समोर आडके-शिंदे, मागे रिमोट कंट्रोल राजकारण!, नाशिक महापालिकेत ठराविक नेतेच खरे बॉस?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com