नरेंद्र मोदींनी लाँच केली लॉजिस्टिक पॉलिसी : 'विकसित भारताच्या दिशेने मोठे पाऊल'

Narendra Modi : लॉजिस्टिकची किंमत जीडीपीच्या 13 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी नरेंद्र मोदींनी नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी लाँच केली. आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, "विकसित भारत घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी ही भारताच्या लॉजिस्टिक इकोसिस्टमची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक मोठे पाऊल असणार आहे. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीने सर्व क्षेत्रांसाठी नवी ऊर्जा घेऊन येईल."

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या योजनांवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज सर्वत्र मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचा डंका वाजत आहे. भारत निर्यातीचे लक्ष्य पूर्णही करत आहे. याशिवाय भारत एक मोठे उत्पादन केंद्र म्हणून सुद्धा उदयास येत आहे.

आज भारतातल्या बंदराच्या एकूण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. जलमार्गाच्या माध्यमातून आपण पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात वाहतूक करू शकतो, त्यासाठी देशात अनेक नवीन जलमार्गही बांधले जात आहेत. लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रभावी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आम्ही सागरमाला,भारतमाला सारख्या योजना सुरू केल्या आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामालाही अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi
'दसरा मेळावा' शिवतीर्थावरच : उद्धव ठाकरेंचा निर्धार

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी म्हणजे काय?

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीमध्ये अभियांत्रिकी, डिजिटायझेशन आणि मल्टी-मॉडल वाहतूक यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आहे. इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात लॉजिस्टिकची किंमत जास्त आहे. देशांतर्गत आणि निर्यातीतही दोन्ही बाजारपेठांमध्ये भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी, भारतातील लॉजिस्टिक खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे. हे धोरण संपूर्ण लॉजिस्टिक इकोसिस्टमच्या विकासासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये होणारा खर्च कमी करण्याचा आणि विविध समस्या सोडवण्याचा एक व्यापक प्रयत्न असणार आहे. या धोरणांतर्गत लॉजिस्टिकची किंमत जीडीपीच्या सुमारे 13 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com