Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मराठी गुरूच्या गावाला भेट देणार? 'स्वाभिमानी'ने पाठवले निमंत्रण

Laxmanrao Inamdar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला ईमेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. हा ईमेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
Narendra Modi , Laxmanrao Inamdar
Narendra Modi , Laxmanrao Inamdarsarkarnama

Maan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणांमध्ये राष्ट्रीय स्वयंम सेवक संघातील त्यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचा उल्लेख करत असतात. लक्ष्मणराव इनामदार हे मूळचे सातार जिल्ह्यातील खटाव येथील. पंतप्रधान मोदी हे माण तालुक्यात येत्या सोमवारी (ता. 19) कै. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या आंधळी धरणातील जलपूजनाला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून लक्ष्मणराव इनामदार यांचे मूळगाव असलेल्या खटावलाही येण्याचे निमंत्रण दिले आहे. (Narendra Modi News)

Narendra Modi , Laxmanrao Inamdar
NCP MLA Disqualification Case: 'नार्वेकरांच्या मनात आमच्या बाजूने निकाल द्यायचे...', जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

'स्वाभिमानी'कडून पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. आता त्यांना उत्तराची प्रतीक्षा आहे. माण तालुक्याच्या दृष्टीने उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभाचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या योजनेची सुरुवात 28 वर्षांपूर्वी झाली आहे. या योजनेला पंतप्रधान मोदी यांचे गुरू कै. लक्ष्मणराव इनामदार (laxmanrao inamdar) यांचे नाव देण्यात आले आहे. गुरुवर्य इनामदार यांचे मूळ गाव खटाव असून, त्यांच्या तालुक्यातून आणि गावातून वाहणाऱ्या येरळा नदीचाही 'जिहे कटापूर' योजनेत समावेश आहे. या योजनेतून येरळा नदीवरील 15 बंधारे या योजनेतून भरण्याची तरतूद आहे.

या योजनेतून खटाव तालुक्यातील जवळपास 11,700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यंदा खटावमध्येही दुष्काळ आहे. उरमोडीचे आवर्तन एक महिना उशिरा सुटले आहे. त्यामुळे पिके तर वाया गेली आहेत. मात्र, अशीच परिस्थिती राहिली तर खटावच्या जनतेला पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

जनावरांना ओला चारा मिळणार नसल्याने पशुधन अडचणीत येणार आहे. त्यामुळे येरळा नदी प्रवाहित करून खटावच्या जनतेचा आनंद द्विगुणित करावा, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला ईमेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. हा ईमेल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यालयाला प्राप्त झाला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोदी यांच्या कार्यालयाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.

(Edited By Roshan More)

Narendra Modi , Laxmanrao Inamdar
Eknath Shinde : महायुतीच्या ठाण्यातील उमेदवाराची आज घोषणा? शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बड्या नेत्यांची मांदियाळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com