Ichalkaranji politics : इचलकरंजीतील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर आता एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत. आमदार आवाडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण अद्याप या आजी-माजी आमदारांध्ये फारसे सूर जुळले नसल्याचे चित्र आज पून्हा दिसले.
बिल्डर्स असोसिएशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप पक्षप्रवेशानंतर आमदार आवाडे व हाळवणकर एकत्र आले होते. यावेळी दोघांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगली. आवाडे यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर प्रथमच आज एकाच मंचावर आले. त्यावेळी दोघे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.
आवाडे व आम्ही आता भाजप(BJP)मध्ये एकत्र आहोत. त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतले आहे. पण पुढे आम्हालाच पक्षातून काढू नका, अशा मोजक्याच शब्दात आवाडे यांच्याकडे पाहत हाळवणकर यांनी चिमटा काढला. त्यानंतर आवाडे यांनी आपल्या भाषणात या संदर्भाने बरीच मांडणी करतांना आता आपले नेते एकच असून लक्ष्यही एकच असल्यांने हातात हात घालून भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास करुया, असे नमूद केले.
हाळवणकर यांनी माझा दोनवेळा पराभव केला. त्यांचा मी एकदा पराभव केला आहे. त्यानंतर त्यांच्याच पक्षाला पाठिंबा दिला. आता मी त्यांच्याच पक्षात गेलो आहे. त्यामुळे आमची भांडणे आता संपली आहेत. इर्षा बाजूला गेली आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आल्यामुळे आता राजकारणातील गमतीची धार कमी झाली आहे, असे आमदार आवाडे यांनी यावेळी नमूद केल्यानंतर कार्यक्रमस्थळी हास्य पसरले.
मी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या मुंबई कार्यालयात कायम जातो. पण गेल्या पाच वर्षात इचलकरंजीतील भाजप कार्यालयात आजपर्यंत पाय ठेवलो नाही. आता सन्मानाने बोलविल्यावरच कार्यालयात येणार आहे, असे आव्हान देत आमदार आवाडे(Prakash Awade) यांनी यापुढे आपणास हातात हात घालूनच काम करावे लागणार आहे, असे सांगत एकप्रकारे हाळवणकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.