India PM News : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, 'या' नेत्यांची मंत्रिपदासाठी चर्चा

India PM Swearing In Ceremony : 'मोदी सरकारच्या 3.0' च्या सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चित भागातील खासदारांना संधी मिळणार आहे.
narendra modi
narendra modisarkaranama

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ( एनडीए ) नेते नरेंद्र मोदी आज, रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधानपदाची शपथ घेतील. नव्या मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन जातील. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

'मोदी सरकारच्या 3.0' च्या सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. त्यातील 40 ते 45 मंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यासह शपथ घेण्याची शक्यता आहे. यासाठी 'एनडीए'च्या घटकपक्षांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याकडे नावे सादर केली आहेत.

मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चित भागातील खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा राजकीय अनुभव आणि शिक्षण विचारात घेतले जात आहे. 'एनडीए'मध्ये भाजपनंतर चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4 मंत्रिपद मिळू शकतात.

महाराष्ट्रातून कोणाच्या नावाची शक्यता?

राज्यातून नितीन गडकरी तिसऱ्यांदा तर नारायण राणे दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्यासह पीयूष गोयल, रामदास आठवले, शिंदे गटातील मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे तर अजित पवार गटामधील प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

narendra modi
Nitish Kumar : नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर; ‘इंडिया’च्या प्लॅनिंगचा भांडाफोड

संभाव्य मंत्र्यांमध्ये देशातून आणखी कोण-कोण?

अमित शाह, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद पटेल, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, ज्योतिरादित्य शिंदे, मनसुख मांडविया, अनुराग ठाकूर, किरन रिजीजू, डॉ. जितेंद्र सिंह, सुरेश गोपीनाथ, शिवराजसिंह चौहान, फग्गनसिंह कुलस्ते, शोभा करंदलाजे, किशन रेड्डी, बंडी संजय, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com