Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिंदे गटाच्या युवा सैनिकांचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात अनेक नेत्यांनी आपली मनोगते मांडली. या दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 2019 ची घटना सांगत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल मातोश्रीतील वरिष्ठ नेत्यांचे काय मत आहे? या बाबत खुलासा केला. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक देखील उपस्थिती होती.
राजेश क्षीरसागर म्हणाले, शहरातील एका गरीब विधवा महिलेची मुलगी होलिक्रॉस इंग्रजी शाळेत शिकत होती. शाळेकडून सात हज़ार रुपये इमारत फंड तिच्याकडून मागितला गेला. तिची कुवत नव्हती. त्या महिलेने आमच्याकडे न्याय मागितला. त्याचा जाब विचारण्यासाठी युवासेनेचे कार्यकर्ते शाळेत गेले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, शाळेच्या मुख्याध्यापिकेने उडवाउडवीची उत्तरे दिली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान केला, म्हणून शाळा फोडली. ते युवासेनेचे पदाधिकारी जेलमध्ये जाऊन आले. समाजासाठी काही तरी चांगले करण्याचा हेतू त्या युवासैनिकांचा होता. पण मातोश्रीवरून त्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश आला. पण माझी भूमिका ठाम होती. त्यांची हकालपट्टी करणार असाल, तर माझ्या आमदारकीची राजीनामा घ्या, असा मेल मातोश्रीला पाठवला असल्याचा खुलासा क्षीरसागर यांनी केला.
कोल्हापूर-कसबा बावडा रोडवरील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये बिल्डींग फंड म्हणून विद्यार्थ्यांकडून फी मागितली जात होती. अशी तक्रार काही पालकांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडे केली होती. याच कारणातून युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शाळेच्या कार्यालयामध्ये घुसून शाळा प्रशासनाला त्याचा जाब विचारला होता. मात्र उडवाउडावीची उत्तरे मिळाल्यानंतर युवासेनेच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. यामध्ये कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या काचा, तसेच मुख्याध्यापक यांच्या टेबलवरील काच तसेच काँप्युटरची देखील तोडफोड केली होती. ही घटना 22 जानेवारी 2019 ला घडली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.