Rajasthan, MP, Chhattisgarh Chief Minister : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने खणखणीत यश मिळवले. एक हाती सत्ता भाजपने मिळवली असली तरी अजुनही या राज्यांचे मुख्यमंत्री कोण होणार हे समोर आले नाही. जेव्हा मुख्यमंत्री घोषित करण्यास उशीर होतो तेव्हा भाजप नवीन चेहऱ्याला संधी देते, असा इतिहास आहे. नरेंद्र मोदी नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तराखंड, हिमाचल आणि उत्तरप्रदेशमध्ये विजय मिळवला. मात्र, मुख्यमंत्री घोषित करण्यास उशीर केला. जेव्हा मुख्यमंत्री घोषित केले तेव्हा सगळ्यांना आश्चर्यचकीत करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. तर, 2013 च्या निवडणुकीत अवघ्या तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेत राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडमध्ये रमण सिंग मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते.
आता 2017 प्रमाणे मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून वेळकाढूपणा कला जातो आहे. याचा अर्थ नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचारात भाजपचे वरिष्ठ नेते असल्याचे दिसून येतंय. कारण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जुन्या चेहऱ्यांमध्ये राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडमध्ये रमण सिंग हे माजी मुख्यमंत्री सर्वात पुढे आहेत. यांना जर भाजपकडून पुन्हा संधी देण्याचे ठरले असते तर निवडणुक निकाला नंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असती. मात्र, नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काय परिणाम होतील, यावर विचार करण्यासाठी भाजपकडून वेळकाढू पणा केला जातो आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागले आहे. या निवडणुकीत हिंदी पट्यातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही राज्य महत्त्वाची भुमिका बजावू शकणार आहेत. त्यामुळे येथे नवीन चेहऱ्याचा मुख्यमंत्री दिला तर त्याचा लोकसभेत किती फायदा होईल, याविषयी भाजपमध्ये एकमत दिसून येत नाही. 2024 ची लोकसभा निवडणुक होई पर्यंत कोणताही धोका पत्कारायला नको, असे एक विचारप्रवाह भाजपमध्ये दिसून येतो.
मुख्यमंत्री पदासाठी राजस्थानमध्ये वसुंधरा यांच्यासोबत अश्विनी वैष्णव, अर्जुन राम मेघवाल, दिया कुमारी, सीपी जोशी यांची नावे चर्चेत आहेत. तर, मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहाण यांच्यासोबत ज्योतीरादित्य सिंधीया, कैलास विजयवर्गीय, प्रल्हाद सिंह पटेल, नरेंद्र सिंग तोमर, रिती पाठक अशी नावे चर्चेत आहेत. या नावांपेक्षा वेगळ्या नावावर देखील भाजप वरिष्ठांकडून विचार होऊ शकतो.
Edited by Roshan More
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.